मुंबई : दूरसंचारासह विविध क्षेत्रांत आगामी तीन वर्षांत तब्बल एक लाख ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली. कंपनीच्या चाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
दूरसंचार, ४ जी, पेट्रोलियम उद्योग, माध्यम उद्योग अशा सर्वच क्षेत्रात सध्या अग्रगण्य असलेल्या रिलायन्स कंपनीतर्फे आगामी काय घोषणा होतात, याकडे सर्वच गुंतवणूकदारांचे लक्ष होते. त्यावेळी एक ला ८० हजार कोटींच्या भरीव घोषणेसह कंपनीच्या बहुप्रतिक्षित अशा ४ जी सेवेबद्दलही मुकेश अंबानी यांनी विस्तृत भाष्य केले. रिलायन्स जिओ पुढच्या वर्षी देशभरात ४ जी सेवा सुरू करणार असून या सेवेच्या माध्यमातून देशातील पाच हजार शहरे व अडीच लाख गावांपर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीतर्फे होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही एकट्या दूरसंचार क्षेत्रात होणार आहे. पेट्रोलियम, केमिकल आणि रिटेल क्षेत्रातील विस्तारही करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. कंपनीला जगातील प्रमुख ५० कंपन्यांमध्ये पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
तीन वर्षांत रिलायन्स करणार एक लाख ८० हजार कोटींची गुंतवणूक
दूरसंचारासह विविध क्षेत्रांत आगामी तीन वर्षांत तब्बल एक लाख ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली
By admin | Updated: June 19, 2014 04:38 IST2014-06-19T04:38:15+5:302014-06-19T04:38:15+5:30
दूरसंचारासह विविध क्षेत्रांत आगामी तीन वर्षांत तब्बल एक लाख ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली
