- मनोज गडनीस, मुंबई
सोमवारी मुंबई शेअर बाजारामध्ये १६०० अंकांची घसरण झाल्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले तरी, ज्यांनी आजवर गुंतवणूक केलेली नाही अथवा सध्या शेअर बाजारात फारच वरच्या पातळीवर आहे, अशी भावना असलेल्या गुंतवणूकदारांना एक नवी संधी उपलब्ध झाल्याचे विश्लेषण गुंतवणूकतज्ज्ञांनी केले आहे.
बाजार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही घटकांतील घसरणीनंतर हे दोन्ही निर्देशांक त्यांच्या आॅक्टोबर २०१४ च्या पातळीच्याही खाली उतरले आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये सेन्सेक्स २६,६८१ अंशांच्या पातळीवर होता. सोमवारी सेन्सेक्समध्ये झालेल्या १६०० अंशाच्या घसरणीनंतर सेन्सेक्स २५,७४१ अंशांपर्यंत खाली घसरला आणि सोमवारी पुन्हा २९० अंशांनी सावरत २६,०३२ अंशांपर्यंत वधारला. त्यामुळे सध्या देशांतर्गत अर्थकारणातील सुधार आणि त्या अनुषंगाने विचार केला समभाग खरेदीची एक उत्कृष्ट संधी असल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
चीनी अर्थव्यवस्थेतील मंदी आणि त्या अनुषंगाने जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याच्या रुपाने दिसून आला. घसरणीचा वेध घेतला तर असे लक्षात येते की, या घसरणीचा फटका अनेक दिग्गज कंपन्यांना बसला. ३० कंपन्यांच्या समावेशाने तयार झालेल्या सेन्सेक्स श्रेणीत ११ कंपन्यांच्या समभाग मूल्यात किमान २ ते कमाल ४ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स श्रेणीत समावेश असलेल्या कंपन्या या भांडवलाच्या उपलब्धीने भक्कम तर आहेतच पण या कंपन्यांची स्वत:ची स्थिती देखील अतिशय भक्कम आहे. तरीही त्यांच्या समभागांची विक्री झाल्यामुळे त्यांची किंमत कमी झाली आहे.
बँकिंगसह विविध क्षेत्रांत घसरण
केवळ सेन्सेक्सच नव्हे तर बँकिंग, पायाभूत सेवा, वाहन, तेल अशा विविध कंपन्यांन्यांच्या समावेशाने निर्माण झालेल्या अन्य निर्देशांकातील भक्कम कंपन्यांनाही फटका बसला आहे.
बाजाराची सुदृढता तपासण्यासाठी ज्या कंपन्यांकडे पाहिले जाते, अशा सुमारे १०० कंपन्यांना फटका बसला आहे. विशेष म्हणजे, या सर्वच कंपन्यांच्या समभागाचे मूल्य घसरून मे २०१४ ते आॅक्टोबर २०१४ कालावधीतील मूल्याच्या पातळीपर्यंत उतरले आहे. त्यामुळे या कंपन्यांतही गुंतवणुकीची संधी असल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
गुंतवणुकीची पुन्हा संधी
सोमवारी मुंबई शेअर बाजारामध्ये १६०० अंकांची घसरण झाल्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले तरी, ज्यांनी आजवर गुंतवणूक केलेली नाही अथवा सध्या शेअर बाजारात
By admin | Updated: August 26, 2015 03:25 IST2015-08-26T03:25:52+5:302015-08-26T03:25:52+5:30
सोमवारी मुंबई शेअर बाजारामध्ये १६०० अंकांची घसरण झाल्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले तरी, ज्यांनी आजवर गुंतवणूक केलेली नाही अथवा सध्या शेअर बाजारात
