Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात गुंतवणूक वाढेल- जेटली

देशात गुंतवणूक वाढेल- जेटली

देशातील अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे येत्या काही दिवसांत गुंतवणुकीत उल्लेखनीय वाढ होईल

By admin | Updated: January 12, 2015 23:38 IST2015-01-12T23:38:53+5:302015-01-12T23:38:53+5:30

देशातील अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे येत्या काही दिवसांत गुंतवणुकीत उल्लेखनीय वाढ होईल

Investment in the country will grow: Jaitley | देशात गुंतवणूक वाढेल- जेटली

देशात गुंतवणूक वाढेल- जेटली

गांधीनगर : देशातील अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे येत्या काही दिवसांत गुंतवणुकीत उल्लेखनीय वाढ होईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले. येथे भरलेल्या व्हायब्रंट गुजरात संमेलनानिमित्त ते सोमवारी बोलत होते.
जेटली म्हणाले, ‘सरकारने गेल्या काही दिवसांत अनेक उपाययोजना केल्या असून भारताबद्दल खूपच सकारात्मकता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत गुंतवणुकीत उल्लेखनीय वाढ होईल अशी मला आशा आहे.’ पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यास सरकारचे प्राधान्य असेल.
उत्पादनासाठी खर्च करण्यास प्रोत्साहन देणे, त्यातून वाढीला गती येईल म्हणजे रोजगार जास्त प्रमाणात वाढतील, असे जेटली यांनी सांगितले. देशात पुढील वर्षी एकसारखा वस्तू सेवा कर (जीएसटी) लागू केला जाईल. सरकारने गेल्या महिन्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक सादर केले होते.

Web Title: Investment in the country will grow: Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.