Lokmat Money > बिझनेस न्यूज > गंगेत घाण सोडणा-या कारखान्याची चौकशी

गंगेत घाण सोडणा-या कारखान्याची चौकशी

बुलंदशहरमधील (उत्तर प्रदेश) वेव इंडस्ट्रीज नामक साखर कारखान्याने प्रक्रिया न केलेले पाणी गंगा नदीत सोडल्याप्रकरणी संयुक्त चौकशी होणार आहे.

By admin | Updated: January 14, 2015 00:19 IST2015-01-14T00:01:51+5:302015-01-14T00:19:15+5:30

बुलंदशहरमधील (उत्तर प्रदेश) वेव इंडस्ट्रीज नामक साखर कारखान्याने प्रक्रिया न केलेले पाणी गंगा नदीत सोडल्याप्रकरणी संयुक्त चौकशी होणार आहे.

Investigation of the factory in Ganga | गंगेत घाण सोडणा-या कारखान्याची चौकशी

गंगेत घाण सोडणा-या कारखान्याची चौकशी

नवी दिल्ली : बुलंदशहरमधील (उत्तर प्रदेश) वेव इंडस्ट्रीज नामक साखर कारखान्याने प्रक्रिया न केलेले पाणी गंगा नदीत सोडल्याप्रकरणी संयुक्त चौकशी होणार आहे. ही चौकशी करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणने (एनजीटी) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.
एनजीटीचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार यांच्या पीठाने वरील दोन्ही मंडळांना त्यांच्या अधिकाऱ्यांना संयुक्त समिती तयार करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी होणार असून त्याआधी एक आठवडा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
नदीत सोडल्या जाणाऱ्या पदार्थांचे प्रमाण किती आहे व वेव इंडस्ट्रीज लिमिटेडमधील एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लँट (ईटीपी) योग्यरीत्या काम करीत आहे की नाही याची चौकशी करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Investigation of the factory in Ganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.