बजारपेठेत सज्ज : भाज्या, कंदमुळे, फळांना मोठय़ा प्रमाणात मागणी माटोळीचे साहित्य खरेदीसाठी लोकांची गर्दीपणजी : गणेश चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. सजावटीच्या सामानाबरोबरच आता बाजारपेठा माटोळीच्या सामानाने भरल्या आहेत. पणजी कांपाल परिसर आणि बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात रानटी फळे, तसेच इतर साहित्याच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे.गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी घराघरांत माटोळी बांधण्यात येते. माटोळीला रानटी फळे आणि भाज्यांही बांधण्यात येतात. गणेश चतुर्थी हा निसर्गाच्या सान्निध्यात नेणारा सण आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरातील बाजारपेठेतही निसर्ग फळे-फुले दाखल झाली आहेत. पावसाची रिमझिम सुरूच होती; पण खरेदी आवश्यक असल्याने काही लोकांनी छत्रीशिवाय बाजार करणे पसंत केले. ग्रामीण भागातून येणार्या (गावठी) भाज्या, कंदमुळे, फळे यांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्याचप्रमाणे याचे दर ठरलेले नसल्याने म्हणेल तो दर ग्राहकांना मोजावा लागतो. ग्राहक आपल्या ऐपतीप्रमाणे तो विकत घेतो. (प्रतिनिधी)(बॉक्स करणे) महादेव व गौरीचे साहित्य बाजारात दाखलबाजारात खास देवपूजेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले आहेत. एकीकडे खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढत आहे व वस्तूंचा भावही वाढत आहे. महादेवाच्या पूजेसाठी लागणारा असोला आणि माडावरून उतरवून काढण्यात आलेल्या नारळाची किंमत 60 ते 80 रुपये सांगण्यात येते, तर गौर बांधण्यासाठी वापरण्यात येणार्या कासाळय़ाच्या पानाची किंमत 20 ते 25 रुपये सांगितली जाते. गौराईसाठी लागणार्या स्थानिक शहाळ्याची किंमतही 50 रुपये झाली आहे. गौराईला नैवेद्यासाठी शहाळे दाखविले जाते. त्यामुळे किंमत कितीही असली तरी ग्राहक सामान खरेदी करतात. (बॉक्स करणे) चतुर्थीच्या तोंडावर पावसाने हजेरी लावल्यामुळे पाडेली माडावर चढण्यास घाबरतात. नारळ पाडण्यापेक्षा तो उतरवून काढण्यास खूप कष्ट पडत असल्याने व पाडेलीच्या रकमेत वाढ झाल्याने यंदा महादेवाच्या नारळाची किंमत वाढली आहे.
पान-1 बाजारपेठेत माटोळीचे सामान दाखल
बाजारपेठेत सज्ज : भाज्या, कंदमुळे, फळांना मोठय़ा प्रमाणात मागणी
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:22+5:302014-08-27T21:30:22+5:30
बाजारपेठेत सज्ज : भाज्या, कंदमुळे, फळांना मोठय़ा प्रमाणात मागणी
