Lokmat Money > बिझनेस न्यूज > आंतरराष्ट्रीय घसरणीचा भारतीय बाजारालाही फटका

आंतरराष्ट्रीय घसरणीचा भारतीय बाजारालाही फटका

चीनमधील मंदीमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेली घट, खनिज तेलाच्या घटत्या किमती आणि रुपयाची सुरू असलेली घसरण अशा विविध नकारात्मक बाबींनी मुंबई शेअर बाजारातही घसरण झाली

By admin | Updated: January 18, 2016 00:24 IST2016-01-18T00:24:53+5:302016-01-18T00:24:53+5:30

चीनमधील मंदीमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेली घट, खनिज तेलाच्या घटत्या किमती आणि रुपयाची सुरू असलेली घसरण अशा विविध नकारात्मक बाबींनी मुंबई शेअर बाजारातही घसरण झाली

International markets also hit the Indian market | आंतरराष्ट्रीय घसरणीचा भारतीय बाजारालाही फटका

आंतरराष्ट्रीय घसरणीचा भारतीय बाजारालाही फटका

चीनमधील मंदीमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेली घट, खनिज तेलाच्या घटत्या किमती आणि रुपयाची सुरू असलेली घसरण अशा विविध नकारात्मक बाबींनी मुंबई शेअर बाजारातही घसरण झाली. सलग तिसऱ्या सप्ताहातील या गटांगळीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गतसप्ताहात बाजारामध्ये पाच दिवस व्यवहार झाले. त्यातील बुधवारचा अपवाद वगळता सर्वच दिवस निर्देशांक कमी झालेला दिसून आला. सप्ताहभरात मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सुमारे दोन टक्के म्हणजेच ४७९.२९ अंशांनी खाली येऊन २४४५५.०४ अंशांवर बंद झाला. या निर्देशांकातील ५० आस्थापनांच्या समभागांपैकी ४३ समभाग लाल रंगामध्ये बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १६३.६० अंशांनी कमी होऊन ७४३७.८० अंशांवर बंद झाला. सप्ताहामध्ये बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक स्मॉलकॅप आणि मिडकॅप हे अनुक्रमे ७.४६ आणि ५.९० टक्क्यांनी घसरले आहेत. सलग तिसऱ्या सप्ताहात ही गटांगळी आहे.
भारतामधील औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची आकडेवारी गतसप्ताहामध्ये जाहीर झाली. गेल्या चार वर्षांमधील नीचांकी पातळीवर हा निर्देशांक पोहोचला आहे. मात्र या घसरणीचा बाजारावर फारसा परिणाम झालेला दिसला नाही. मात्र गेला संपूर्ण सप्ताह जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झालेली दिसून आली आहे. यामुळे भारतामधील बाजारही खाली आले. चीनमधील चलनाच्या अवमूल्यनानंतरही तेथील बाजाराची घसरण थांबलेली नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गतसप्ताहामध्ये चलनवाढीची आकडेवारीही जाहीर झाली. ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

Web Title: International markets also hit the Indian market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.