नवी दिल्ली : गुजरातेत १५0 कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज उभारण्याची घोषणा मुंबई शेअर बाजाराच्या वतीने सोमवारी करण्यात आली. हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज असणार आहे.
गुजरात आंतरराष्ट्रीय वित्त तंत्रज्ञान शहरात (गिफ्ट) या एक्स्चेंजची स्थापना करण्यात येणार आहे. गिफ्ट सिटीसोबत बीएसईच्या संबंधित करारावर व्हायब्रंट गुजरात परिषदेत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
गिफ्ट सिटी हा एक सेज प्रकल्प असून गुजरात सरकारच्या वतीने त्याचा विकास केला जात आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय एक्स्चेंजचा वापर वित्तीय सेवा केंद्राच्या स्वरूपात केला जाईल. या एक्स्चेंजमध्ये समभागांचा व्यवसाय आणि निपटारा होईल. याशिवाय वस्तू, मुद्रा, मालमत्ता आणि इतर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वायदे व्यवहार करता यावेत यासाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल.
या एक्सचेंजमध्ये जगभरातील गुंतवणूकदारांना व्यवहारासाठी आकर्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी खास प्रयत्न गुजरात सरकारकडून करण्यात येणार आहेत.
गुजरातेत उभारणार आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज
गुजरातेत १५0 कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज उभारण्याची घोषणा मुंबई शेअर बाजाराच्या वतीने सोमवारी करण्यात आली.
By admin | Updated: January 12, 2015 23:41 IST2015-01-12T23:41:36+5:302015-01-12T23:41:36+5:30
गुजरातेत १५0 कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज उभारण्याची घोषणा मुंबई शेअर बाजाराच्या वतीने सोमवारी करण्यात आली.
