मुंबई : बँकांनी त्यांच्या ग्राहकांच्या बचत खात्यात दर तीन महिन्याला किंवा त्यापेक्षा कमी अवधीत व्याज जमा करावे, असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. रिझर्व्ह बँकेचा हा आदेश कोट्यवधी ग्राहकांच्या हिताचा समजला जात आहे.
सध्या बँकांतील बचत खात्यात दर सहा महिन्याला व्याज जमा केले जाते; मात्र बचत खात्यात एक एप्रिल २0१0 पासून प्रति दिवसाच्या हिशेबाने व्याजाची गणना केली जाते. याबाबत रिझर्व्ह बँकेने तीन मार्च रोजी याबाबत एक सूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, बचत खात्यावरील जमा रकमेवर प्रत्येक तिमाहीला किंवा त्यापेक्षा कमी अवधीत व्याज जमा केले पाहिजे.
सध्या सरकारी क्षेत्रातील बँका बचत खात्यातील जमा रकमेवर चार टक्के दराने व्याज देतात, तर खासगी क्षेत्रातील बँका ६ टक्के दराने व्याज देतात. २0११ मध्ये रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना बचत जमा रकमेवर व्याजदर निश्चित करण्याचे अधिकार दिले होते.
नियंत्रित व्याजदर देण्याच्या धोरणावर हा एक महत्त्वाचा निर्णय होता. त्याचबरोबर एक लाख रुपयांपर्यंतच्या जमा रकमेवर समान व्याजदर देण्याची पेशकश बँकांनी केली पाहिजे, असेही रिझर्व्ह बँकेने त्यावेळी म्हटले होते. त्यापेक्षा जास्त रकमेवरील जमा रकमेवर वेगवेगळे व्याजदर देण्याची परवानगीही देण्यात आली होती.
बँकांवर ५00 कोटींचा बोझा पडणार
- विश्लेषकांच्या मते, जेवढा कमी अवधी राहील तेवढा जमा रक्कम ठेवणाऱ्यांचा फायदा होईल.
- बँकांना ग्राहकांना अधिक रक्कम द्यावी लागेल. एका अंदाजानुसार बचत खात्यात कमी अवधीत व्याज जमा केल्यास बँकांवर ५00 कोटींचा बोझा पडेल.
- यापूर्वी बँका बचत खात्यावर ३.५ टक्क्यांनी व्याजदर देत होत्या.
- व्याजाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या १0 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्वांत कमी रकमेवर दिली जात होती.
बचत खात्यांवर ३ महिन्यांनी व्याज
बँकांनी त्यांच्या ग्राहकांच्या बचत खात्यात दर तीन महिन्याला किंवा त्यापेक्षा कमी अवधीत व्याज जमा करावे, असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. रिझर्व्ह बँकेचा हा आदेश कोट्यवधी
By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST2016-03-16T08:38:13+5:302016-03-16T08:38:13+5:30
बँकांनी त्यांच्या ग्राहकांच्या बचत खात्यात दर तीन महिन्याला किंवा त्यापेक्षा कमी अवधीत व्याज जमा करावे, असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. रिझर्व्ह बँकेचा हा आदेश कोट्यवधी
