Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

स्टेट बँक आॅफ इंडियाने सोमवारी ठेवींवरील दरात तब्बल अर्ध्या टक्क्यांपर्यंत कपात केली.

By admin | Updated: May 2, 2017 05:24 IST2017-05-02T05:24:48+5:302017-05-02T05:24:48+5:30

स्टेट बँक आॅफ इंडियाने सोमवारी ठेवींवरील दरात तब्बल अर्ध्या टक्क्यांपर्यंत कपात केली.

Interest rates on fixed deposits | मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाने सोमवारी ठेवींवरील दरात तब्बल अर्ध्या टक्क्यांपर्यंत कपात केली. एक कोटी
रुपयांपर्यंतच्या विविध मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर तातडीने कमी करण्यात आले आहेत. यानुसार बँकेचा दोन ते तीन वर्षांच्या ठेवीवरील वार्षिक व्याजदर ६.७५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर तीन ते पाच वर्षे मुदतीसाठीचा व्याजदर ६.५० टक्क्यांवरून पाव टक्क्याने कमी करण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँकेनेही ठेवींवरील व्याजदर ०.१० ते ०.१५ टक्क्यांनी कमी केले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Interest rates on fixed deposits