हैदराबाद : भारतातील विमा क्षेत्र गुंतवणूकदारांसाठी आजही आकर्षक असल्याचा निर्वाळा भारतीय विमा नियामक प्राधिकरणाचे (इरडा) चेअरमन टी.एस. विजयन यांनी दिला. विमा क्षेत्रतील काही कंपन्यांना नुकसान होत असून या क्षेत्रला मोठय़ा संख्येने प्रशिक्षित कर्मचा:यांची गरज आहे. या क्षेत्रतील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा केंद्र सरकार निश्चित करील. कंपन्या नियम पाळतात की नाही, हे पाहण्याचे इरडाचे काम आहे. जनधन योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे या खात्याला देण्यात आलेले विमा संरक्षण होय, असे त्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रिस्क मॅनेजमेंटच्या एका कार्यक्रमात सांगितले.