Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्लेम नाकारल्याबद्दल विमा कंपनीला दंड

क्लेम नाकारल्याबद्दल विमा कंपनीला दंड

सर्पदंशाने महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला व्यक्तिगत अपघात विमा योजनेची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स

By admin | Updated: May 9, 2015 00:20 IST2015-05-09T00:20:47+5:302015-05-09T00:20:47+5:30

सर्पदंशाने महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला व्यक्तिगत अपघात विमा योजनेची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स

Insurance company penalty for denial of claim | क्लेम नाकारल्याबद्दल विमा कंपनीला दंड

क्लेम नाकारल्याबद्दल विमा कंपनीला दंड

भंडारा : सर्पदंशाने महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला व्यक्तिगत अपघात विमा योजनेची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या मुंबई शाखेला ग्राहक मंचने दंड ठोठावला आहे.
शारदा मारुती निंबेकर, रा. सेंदूरवाफा, ता.साकोली यांना शेतात काम करीत असताना विषारी सापाने चावा घेतला. त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या कुटुंबियांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा दाखल केला; मात्र कंपनीने व्हिसेरा अहवालाअभावी विमा दावा खारीज केला. सर्पदंशाने महिला शेतकऱ्याचा मृत्यू होऊनही विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे समजताच निंबेकर कुटुंबियांनी ग्राहक मंचकडे धाव घेतली. मंचने कंपनीच्या मुंबई शाखेला नोटीस पाठविली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कंपनीने मृत महिलेच्या कुटुंबियांना अपघात विमा योजनेचे एक लाख रुपये व्याजासह ११ फेब्रुवारी २०११ पासून द्यावेत, त्रासापोटी पाच हजार रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला. तक्रारकर्त्यांकडून अ‍ॅड. एस. एस. चन्ने यांनी काम पाहिले.

Web Title: Insurance company penalty for denial of claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.