अोला : मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने मनपाच्या अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.पावसाळ्यात अचानकपणे नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी मनपा प्रशासनाच्यावतीने नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. यामध्ये अग्निशमन, आरोग्य, बांधकाम, नगर रचना, विद्युत विभाग, शिक्षण,जलप्रदाय व अतिक्रमण विभागाच्या प्रमुख अधिकार्यांनी नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षासोबत समन्वय साधून नागरिकांना भेडसावणार्या समस्यांचे निराकरण करणे, त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे आदी बाबींचा समावेश आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सर्व विभागप्रमुखांना निर्देश दिले आहेत. नागरिकांना नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास अग्निशमन विभागातील नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक (०७२४) २४३४४६० व १०१ येथे संपर्क साधावा.
अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती कक्ष कार्यान्वित मनपा आयुक्तांचे निर्देश
अकोला : मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने मनपाच्या अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
By admin | Updated: June 2, 2014 23:54 IST2014-06-02T23:54:09+5:302014-06-02T23:54:09+5:30
अकोला : मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने मनपाच्या अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
