मंबईचा निकाल ८८.३० टक्केबारावी परीक्षेला मुंबई विभागातून २ लाख ८७ हजार ८१४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ लाख ५४ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागाचा एकूण निकाल ८८.३० टक्के लागला आहे. परीक्षेत २८ हजार ७८१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर ६० टक्क्यांहून अधिक गुण ८४ हजार ८८ विद्यार्थ्यांना, ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण १ लाख २१ हजार ६९१ विद्यार्थ्यांना आणि ३५ टक्क्यांहून पुढे गुण १९ हजार ५७८ विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.कला शाखेचा निकाल ८४.६५ टक्के, विज्ञान शाखेचा ९०.७१ टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल ८७.९१ टक्के लागला आहे. तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल ९४.५३ टक्के लागला आहे.़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़मुंबईतही मुलींची बाजीमुंबई विभागातून परीक्षेला १ लाख ५२ हजार ८४७ मुले बसली होती, तर १ लाख ३४ हजार ९६७ मुली बसल्या होत्या. यामधील १ लाख २९ हजार ५१० मुले उत्तीर्ण झालीआहेत, तर १ लाख २४ हजार ६२८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ८४.७३ टक्के मुले या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून ९२.३४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुंबईतही मुलींनी निकालात बाजी मारली आहे.़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़म्हणून निकाल घटलामुंबई विभागीय मंडळातून खासगीरीत्या (१७ नंबरचा अर्ज भरून) परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. इतर मंडळांच्या कित्येक पट अधिक म्हणजे सुमारे २० हजार ७३४ विद्यार्थी खासगीरीत्या परीक्षेला बसले होते. यामधील किरकोळ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतात. मात्र, अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्याने मंडळाचा निकाल घटला असल्याचे मत मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी व्यक्त केले.
आतील पानासाठी - मुंबई विभाग
मुंबईचा निकाल ८८.३० टक्के
By admin | Updated: June 2, 2014 23:43 IST2014-06-02T23:43:55+5:302014-06-02T23:43:55+5:30
मुंबईचा निकाल ८८.३० टक्के
