Lokmat Money > बिझनेस न्यूज > इन्फोसिसचा टीसीएस फॉर्म्युला !

इन्फोसिसचा टीसीएस फॉर्म्युला !

व्यवसायवृद्धीसाठी इन्फोसिसने आता आपल्या प्रतिस्पर्धी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसचा (टीसीएस) फॉर्म्युला वापरण्याचे ठरविले आहे.

By admin | Updated: August 30, 2016 04:51 IST2016-08-30T04:51:13+5:302016-08-30T04:51:13+5:30

व्यवसायवृद्धीसाठी इन्फोसिसने आता आपल्या प्रतिस्पर्धी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसचा (टीसीएस) फॉर्म्युला वापरण्याचे ठरविले आहे.

Infosys TCS Formula! | इन्फोसिसचा टीसीएस फॉर्म्युला !

इन्फोसिसचा टीसीएस फॉर्म्युला !

मुंबई : व्यवसायवृद्धीसाठी इन्फोसिसने आता आपल्या प्रतिस्पर्धी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसचा (टीसीएस) फॉर्म्युला वापरण्याचे ठरविले आहे. यानुसार या व्यवसायाची छोट्या-छोट्या युनिटमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या युनिटवर कंपनीच्या संचालकांचे खास लक्ष असेल.
दोन वर्षांपूर्वी इन्फोसिसच्या सीईओपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या विशाल सिक्का यांनी मॅनेजमेंट स्तरावर काही जणांना बाहेरचा रस्ता दाखवला. हेल्थकेअर, इन्शुरन्स आणि लाइफ सायन्सचा पदभार असणाऱ्या मनीष टंडन यांनाही नव्या धोरणाचा फटका बसला. इन्फोसिसच्या या धोरणाबाबत विश्लेषक सवाल करत आहेत. जेपी मॉर्गनचे विजू जॉर्ज याबाबत म्हणाले की, इन्फोसिसची मॅनेजमेंट टीम फक्त तीन जणांची राहिली आहे. तर टीसीएसमध्ये आठ हेड आहेत.
गत आठवड्यात विशाल सिक्का यांनी स्पष्ट केले की, आपण कंपनीची छोट्या छोट्या भागांत विभागणी करणार आहोत. हे पीएनएलच्या (प्रॉफिट आणि लॉस) जबाबदारीसाठी आहे. हे युनिट अधिक स्वायत्त असतील. विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वी टीसीएसने एन. चंद्रशेखरन यांच्या काळात हाच प्रयोग केला होता. ५०० ते ७०० मिलियन डॉलर उत्पन्न असणारे छोटे युनिट अनेक ग्राहकांना सेवा देऊ शकतील. अर्थात कंपनीची नेमक्या किती भागांत विभागणी करण्यात येणार आहे, हे समजू शकले नाही. नव्या पिढीतील काही नव्या चेहऱ्यांवरही या युनिटची जबाबदारी देण्यात येणार आहे. 

Web Title: Infosys TCS Formula!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.