Lokmat Money > बिझनेस न्यूज > नगरसेवकापासून खासदारांची माहिती मागविली

नगरसेवकापासून खासदारांची माहिती मागविली

पंतप्रधान कार्यालयाचे पत्र

By admin | Updated: June 28, 2014 01:19 IST2014-06-27T21:20:53+5:302014-06-28T01:19:40+5:30

पंतप्रधान कार्यालयाचे पत्र

The information of MPs is sought from the corporator | नगरसेवकापासून खासदारांची माहिती मागविली

नगरसेवकापासून खासदारांची माहिती मागविली

पंतप्रधान कार्यालयाचे पत्र
नाशिक : केंद्रातील पंतप्रधान कार्यालयाने सर्व राज्यांतील लोकप्रतिनिधींची माहिती मागविली आहे. या माहिती मागविलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका व महापालिकेतील नगरसेवक तसेच आमदार व खासदारांच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांकडून ही माहिती पंतप्रधान कार्यालयाने मागविली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे अतिरिक्त सचिव ए. के. गोयल यांच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. या पत्रात जिल्हा परिषदेकडून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचे नाव, पत्ता, ई-मेल पत्ता व फोन नंबर याबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. अशीच माहिती महापालिका व नगरपालिकांच्या नगरसेवक, तसेच आमदार व खासदारांचीही मागविण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही माहिती तत्काळ पाठविण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची भंबेरी उडाल्याचे चित्र होते.(प्रतिनिधी)

Web Title: The information of MPs is sought from the corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.