Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाई स्थिर..!

महागाई स्थिर..!

चलनवाढीचा गेल्या सहा महिन्यांपासूनच्या घसरणीचा कल डिसेंबरमध्ये किंचितसा म्हणजे ०.११ टक्कासावरला, तोही खाद्यान्नाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे

By admin | Updated: January 15, 2015 06:10 IST2015-01-15T06:10:17+5:302015-01-15T06:10:17+5:30

चलनवाढीचा गेल्या सहा महिन्यांपासूनच्या घसरणीचा कल डिसेंबरमध्ये किंचितसा म्हणजे ०.११ टक्कासावरला, तोही खाद्यान्नाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे

Inflation steady ..! | महागाई स्थिर..!

महागाई स्थिर..!

नवी दिल्ली : चलनवाढीचा गेल्या सहा महिन्यांपासूनच्या घसरणीचा कल डिसेंबरमध्ये किंचितसा म्हणजे ०.११ टक्कासावरला, तोही खाद्यान्नाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे. चलनवाढीचे मोजमाप घाऊक किंमत निर्देशांकावर केले जाते. तो नोव्हेंबरमध्ये शून्य होता.
डिसेंबरमध्ये खाद्यान्नाच्या किमतीतील वाढ गेल्या पाच महिन्यांतील सर्वात जास्त म्हणजे ५.२ टक्के होती, असे सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती घसरल्यामुळे डिसेंबरमध्ये चलनवाढ रोखायला मोठी मदत झाली. घाऊक किंमत निर्देशांक हा ०.६ टक्का वाढण्याचे भाकीत होते. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये डाळी, भाज्या आणि फळे महाग होती. दुसऱ्या बाजूला गहू, दूध, अंडी, मांस व माशांच्या किमती खाली राहिल्या.
गेल्या वर्षी जूनपासून जागतिक बाजारपेठेत तेलाची किंमत जवळपास ६० टक्क्यांनी घटली आणि कमी पाऊस पडूनही खाद्यान्नाच्या किमती नियंत्रणात राहिल्या. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ३ फेब्रुवारीच्या आर्थिक धोरण आढाव्यात रेपो दरांत घट करील अशी आशा आहे. गेले वर्षभर रेपो दर हा ८ टक्क्यांवरच आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती घटल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांक व ग्राहक किंमत निर्देशांक खाली आला, असे आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे गुंतवणूक अधिकारी अनिश श्रीवास्तव यांनी सांगितले. सरकारच्या नाजूक आर्थिक आरोग्याच्या पार्श्वभूमीवर बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन व्याजदरांत कपात करणार नाहीत, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Inflation steady ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.