नवी दिल्ली : दूध, भाजीपाला आदी खाद्यान्नाच्या किमती उतरल्यामुळे गेल्या मार्च महिन्यातील चलनवाढीचा वेग गेल्या तीन महिन्यांतील सगळ्यात कमी म्हणजे ५.१७ टक्के राहिला.
चलनवाढ ही ग्राहक किं मत निर्देशांकावर मोजली जाते. ती फेब्रुवारीत ५.३७ टक्के, तर जानेवारीत ५.१९ टक्के होती. मार्च २०१४ मध्ये चलनवाढीचा दर ८.२५ टक्के होता. गेल्या मार्च महिन्यात दूध, भाज्या व फळांच्या किमतीत घट झाल्यामुळे एकूण खाद्यान्नाच्या किमती कमी होऊन चलनवाढ ६.७९ टक्क्यांवरून ६.१४ वर आली. डाळी आणि डाळींच्या उत्पादनांसाठी चलनवाढ घटली तरी मांस आणि माशांच्या किमती वाढल्या होत्या, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. अन्न आणि मद्यासारख्या पेयासाठी चलनवाढ गेल्या मार्चमध्ये सरसकट ६.२ टक्के होती. ती त्याआधीच्या महिन्यात ६.७६ टक्के होती. ग्राहक किंमत निर्देशांक आधारित चलनवाढीचा दर २०१२ या नव्या वर्षावर मोजला जातो. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४इंधन आणि विजेच्या क्षेत्रात चलनवाढ गेल्या महिन्यात ५.०७ टक्के होती, ती फेब्रुवारीत ४.७२ टक्के होती. घरबांधणीच्या क्षेत्रात चलनवाढ मार्चमध्ये ४.७७ होती ती त्या आधीच्या महिन्यात ४.९८ टक्के होती. ग्रामीण भागात एकूण चलनवाढीचा दर मार्चमध्ये ५.५८, तर शहरी भागात ४.७५ टक्के राहिला.
चलनवाढीला बसला लगाम, तीन महिन्यांतील नीचांक
दूध, भाजीपाला आदी खाद्यान्नाच्या किमती उतरल्यामुळे गेल्या मार्च महिन्यातील चलनवाढीचा वेग गेल्या तीन महिन्यांतील सगळ्यात कमी म्हणजे ५.१७ टक्के राहिला.
By admin | Updated: April 13, 2015 23:38 IST2015-04-13T23:38:48+5:302015-04-13T23:38:48+5:30
दूध, भाजीपाला आदी खाद्यान्नाच्या किमती उतरल्यामुळे गेल्या मार्च महिन्यातील चलनवाढीचा वेग गेल्या तीन महिन्यांतील सगळ्यात कमी म्हणजे ५.१७ टक्के राहिला.
