Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुजरातेत पर्यटनास उद्योगाचा दर्जा

गुजरातेत पर्यटनास उद्योगाचा दर्जा

पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देत गुजरात सरकारने रविवारी सन २०१५ ते २०२० साठी नव्या पर्यटन धोरणाची घोषणा केली

By admin | Updated: September 28, 2015 01:48 IST2015-09-28T01:48:35+5:302015-09-28T01:48:35+5:30

पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देत गुजरात सरकारने रविवारी सन २०१५ ते २०२० साठी नव्या पर्यटन धोरणाची घोषणा केली

Industry status to tourism in Gujarat | गुजरातेत पर्यटनास उद्योगाचा दर्जा

गुजरातेत पर्यटनास उद्योगाचा दर्जा

अहमदाबाद : पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देत गुजरात सरकारने रविवारी सन २०१५ ते २०२० साठी नव्या पर्यटन धोरणाची घोषणा केली. नवे पर्यटन धोरण जाहीर करताना राज्य सरकारने पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अनेक आकर्षक सवलती देऊ केल्या आहेत.
पर्यटन मंत्री सौरभ पटेल यांनी हे नवे पर्यटन धोरण जाहीर केले; शिवाय राज्याच्या इतिहासात प्रथमच पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्याचीही घोषणा केली. उद्योगाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटन क्षेत्रास अनेक प्रकारच्या सवलती आणि फायदे मिळू शकतील. पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने देशातील आघाडीच्या पाच राज्यांत सामील होणे तसेच राज्याचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, या हेतूने नवे पर्यटन धोरण आखण्यात आले असल्याचे पटेल यांनी सांगितले. तूर्तास गुजरात देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनाच्या बाबतीत देशात आठव्या क्रमांकावर आहे, तर विदेशी पर्यटकांच्या संख्येच्या बाबतीत देशात १६ व्या स्थानावर आहे.
नव्या पर्यटन धोरणांतर्गत अनेक सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. याअंतर्गत ५० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या पर्यटन कंपन्यांना १५ टक्के (अधिकाधिक साडेसात कोटींची मर्यादा) तसेच ५० कोटींपेक्षा अधिक भांडवल लावणाऱ्या कंपन्यांना १५ टक्क्यांत (जास्तीतजास्त १० कोटींची मर्यादा) सरकारी सबसिडी दिली जाईल.

Web Title: Industry status to tourism in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.