-----६ वी भारत - जपान न्यूरोसर्जरी परिषद उत्साहातऔरंगाबाद : २९ आणि ३० ऑगस्ट रोजी सहावी भारत-जपान न्यूरोसर्जरी परिषद हॉटेल ताज येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेत मेंदू आणि मणक्याचे आजार व त्यावरील संशोधित शस्त्रक्रिया आणि थ्रीडी मॉडेल वापरून करावयाच्या शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी परिषदेचे उद्घाटन गणेशपूजनाने झाले. परिषदेत मेंदूतील गाठीवर शस्त्रक्रिया कशी करावी. मेंदूतील शस्त्रक्रिया करताना रोबोटिक आर्मचा कसा वापर करावा, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जपानी न्यूरोसर्जन्सनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शस्त्रक्रिया अधिक निर्धोक कशी करावी याविषयी माहिती दिली. या परिषदेत न्यूरो सर्जन्स सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर, जागतिक संघटनेचे सचिव डॉ. बी. के. मिश्रा, जपानमधून आलेले डॉ. केनजी ओहाटा, डॉ. जून योशिदा, डॉ. नोरिओ, डॉ. क्युमो, डॉ. शिराने, डॉ. कोबायशी, तसेच परिषदेचे मुख्य संयोजक डॉ. मिलिंद दुनाखे, डॉ. भावना टाकळकर, डॉ. योगेश वरगंटवार, डॉ. कंदरफळे, डॉ. बगडिया, डॉ.फुटाणे आदी उपस्थित होते.
भारत-जपान न्यूरोसर्जरी परिषद उत्साहात
-----
By admin | Updated: September 1, 2014 21:34 IST2014-09-01T21:34:20+5:302014-09-01T21:34:20+5:30
-----
