नवी दिल्ली : भारत यावर्षी ७.३ टक्के विकास दर राखून जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सगळ्यात वेगाने विकास दर प्राप्त करणारी अर्थव्यवस्था असेल. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यात म्हटले आहे की, २०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.३ टक्के असेल आणि पुढील वर्षी तो वाढून ७.५ टक्के असेल.
दक्षिण आशियाच्या सकल देशी उत्पादनात (जीडीपी) ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर २०१७ मध्ये ७.५ टक्के असेल. तो २०१५ मधील ७.२ टक्क्यांपेक्षा काहीसा जास्त असेल. संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्धीस दिलेल्या ‘जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता २०१६’ या अहवालात भारताची अर्थव्यवस्था जगात सगळ्यात वेगाने वाढणारी असल्याचे म्हटले आहे.
भारताचा विकास दर ७.३ टक्के
भारत यावर्षी ७.३ टक्के विकास दर राखून जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सगळ्यात वेगाने विकास दर प्राप्त करणारी अर्थव्यवस्था असेल.
By admin | Updated: January 23, 2016 03:40 IST2016-01-23T03:40:07+5:302016-01-23T03:40:07+5:30
भारत यावर्षी ७.३ टक्के विकास दर राखून जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सगळ्यात वेगाने विकास दर प्राप्त करणारी अर्थव्यवस्था असेल.
