नवी दिल्ली : भारताने आर्थिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये ग्रीडला २,३११.८८ मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता जोडली आहे. ही ऊर्जा क्षमता सौर आणि पवन ऊर्जासारख्या स्रोतातून मिळविण्यात आली आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात अक्षय ऊर्जा स्रोतांतून ४,४६० मेगावॅट वीज उत्पादन क्षमता जोडण्याचे लक्ष्य आहे. ही क्षमता, सौर, पवन आणि छोट्या जलविद्युत प्रकल्पांतून निर्माण केली जाईल.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत ८२७.२२ मेगावॅट सौर वीज क्षमता जोडली गेली. नवी व नवीकरण ऊर्जा मंत्रालयाने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार या प्रकारे ग्रीडशी जोडलेली सौर वीज क्षमता वाढून ४,५७९.२४ मेगावॅट झाली आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात सौर वीज क्षमता १,४०० मेगावॅट वाढविण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. या प्रकारे पहिल्या सात महिन्यांत १,२३४.११ मेगावॅट पवन वीज क्षमता जोडली गेली आहे. या स्रोतातून एकूण वीज उत्पादन क्षमता २४,६७७.७२ मेगावॅट झाली आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात २,४०० मेगावॅट पवन वीज उत्पादन क्षमता जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. छोट्या जलविद्युत प्रकल्पांतून १०६.५५ मेगावॅट क्षमता जोडली गेली आहे. छोट्या जलविद्युत प्रकल्पांची क्षमता वाढून ४,१६१.९० मेगावॅट झाली आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात छोट्या जलविद्युत प्रकल्पांतून २५० मेगावॅट वीज उत्पादन क्षमता जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
जैव वीज क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात आॅक्टोबरमध्ये १३२ मेगावॅट क्षमता जोडली गेली आहे. याप्रकारे या क्षेत्रातील एकूण उत्पादन क्षमता ४,५५०.५५ मेगावॅट झाली आहे. या क्षेत्रात सरकारचे चालू आर्थिक वर्षात ४०० मेगावॅट क्षमता जोडण्याचे लक्ष्य आह कचऱ्यातून वीजनिर्मिती विभागात आॅक्टोबरपर्यंत १२ मेगावॅट क्षमता जोडली गेली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी १० लाख मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य आहे. या क्षेत्रातून वीज उत्पादन क्षमता १२७.०८ मेगावॅट झाली आहे.
हरित ऊर्जेत भारताची झेप!
भारताने आर्थिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये ग्रीडला २,३११.८८ मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता जोडली आहे. ही ऊर्जा क्षमता सौर आणि पवन ऊर्जासारख्या स्रोतातून मिळविण्यात आली आहे
By admin | Updated: November 27, 2015 00:11 IST2015-11-27T00:11:41+5:302015-11-27T00:11:41+5:30
भारताने आर्थिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये ग्रीडला २,३११.८८ मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता जोडली आहे. ही ऊर्जा क्षमता सौर आणि पवन ऊर्जासारख्या स्रोतातून मिळविण्यात आली आहे
