Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजाराच्या प्रभावी नियमनात भारताची जागतिक रँकिंगमध्ये घसरण

शेअर बाजाराच्या प्रभावी नियमनात भारताची जागतिक रँकिंगमध्ये घसरण

भारतीय भांडवली बाजार सकारात्मक गुंतवणुकीमुळे भलेही आनंदले असले तरी जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालात (डब्ल्यूईएफ) भारतीय शेअर बाजार प्रभावी नियमनाच्या बाबतीत ३५ व्या स्थानावर घसरले आहे

By admin | Updated: September 9, 2014 03:56 IST2014-09-09T03:56:24+5:302014-09-09T03:56:24+5:30

भारतीय भांडवली बाजार सकारात्मक गुंतवणुकीमुळे भलेही आनंदले असले तरी जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालात (डब्ल्यूईएफ) भारतीय शेअर बाजार प्रभावी नियमनाच्या बाबतीत ३५ व्या स्थानावर घसरले आहे

India's global ranking slipped in the effective trading rule | शेअर बाजाराच्या प्रभावी नियमनात भारताची जागतिक रँकिंगमध्ये घसरण

शेअर बाजाराच्या प्रभावी नियमनात भारताची जागतिक रँकिंगमध्ये घसरण

नवी दिल्ली : भारतीय भांडवली बाजार सकारात्मक गुंतवणुकीमुळे भलेही आनंदले असले तरी जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालात (डब्ल्यूईएफ) भारतीय शेअर बाजार प्रभावी नियमनाच्या बाबतीत ३५ व्या स्थानावर घसरले आहे. शेअर बाजारात प्रभावी नियमन आणि प्रतिभूती बाजारात योग्य प्रकारे निगराणीच्या दृष्टीने गेल्या वर्षी भारत २७ व्या स्थानावर होता. अहवालानुसार, याबाबतीत दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फिनलँड, हाँगकाँग एसएआर, लग्जमबर्ग आणि सिंगापूर यांचे स्थान आहे. शेजारी देश पाकिस्तान आणि चीन देखील या प्रकरणी भारताच्या पुढील रँकिंगवर आहेत. पाकिस्तान ५१ आणि चीन ५८ व्या क्रमांकावर आहे. 
हा अहवाल जागतिक आर्थिक मंचाची जागतिक प्रतिस्पर्धात्मकता अहवाल २0१४-१५ भाग आहे. यामध्ये भारतासह जगातील १४४ देशांचा शेअर बाजारांचे नियमनाची रँकिंग देण्यात आली आहे. प्रभावी नियमांसाठी १२ निकष निवडले आहेत. यामध्ये वित्तीय बाजाराचा विकास देखील सामील आहे. भारतीय शेअर बाजारात शेअर काढून कर गोळा करण्यासंबंधात कंपन्यांना होणारी सहजता यामध्ये देखील स्थान घसरून ३९ क्रमांकावर आले आहे. यापूर्वी १८ वे स्थान होते. 
हाँककाँग एसएआरच्या नंतर तायवान, चीन आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांच्या रांगेत सामील आहे. या ठिकाणी इक्विटी बाजारात धन गोळा करणे सर्वांत सोपे काम आहे.

Web Title: India's global ranking slipped in the effective trading rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.