सिंगापूर : आशियात आकर्षक स्थान प्रस्थापित करणाऱ्या भारताचा आर्थिक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात ७.५ टक्के राहील, अशी आशा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केली आहे. तथापि, संरचनात्मक कमकुवतपणामुळे मध्यम अवधीच्या दृष्टीने गती मंदावलेली दिसते, असे मतही आयएमएफने आशिया-प्रशांत विभागीय आर्थिक दृष्टिकोन या अहवालात नमूद केले आहे.
राजकीय स्थैर्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बाह्य जोखीमही कमी झाली आहे. तसेच वस्तूंचे भावही कमी झाले आहेत. त्यामुळे भारताचे एकूण ढोबळ उत्पादन (जीडीपी) ७.२ टक्क्यांवरून २०१५-१६ मध्ये ७.५ टक्के होईल, असा अंदाज आहे.
अलीकडच्या धोरणात्मक उपायांमुळे पुरवठा साखळीतील अडचणी दूर करण्यात मदत मिळाली आहे. तथापि, ऊर्जा, खाण आणि वीज क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे आयएमएफने सूचित केले आहे.
भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने सुधारणा करणे, श्रम बाजार लवचिक करण्यासह व्यावसायिक कार्यप्रणाली साधी-सरळ केल्यास भारतातील व्यावसायिक वातावरण निश्चित सुधारेल. जलद आणि समावेशी वृद्धीसाठी या सुधारणा आवश्यक आहेत, असेही आयएमएफने या अहवालात म्हटले आहे.
चलन फुगवट्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासोबत संरचनात्मक सुधारणाही कराव्या लागतील. वित्तीय स्थिती मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न चालू ठेवावे लागतील. वित्तीय क्षेत्रावरील देखरेखही बारकाईने करावी लागेल, अशी शिफारसही आयएमएफने केली आहे.
एकूणच भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेत आकर्षक स्थान असून तेजीने विकास करणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी भारत एक आहे, असेही स्पष्ट मत आयएमएफने व्यक्त केले आहे.
आशियात भारताचे आकर्षक स्थान
आशियात आकर्षक स्थान प्रस्थापित करणाऱ्या भारताचा आर्थिक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात ७.५ टक्के राहील, अशी आशा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने
By admin | Updated: May 8, 2015 00:57 IST2015-05-08T00:57:21+5:302015-05-08T00:57:21+5:30
आशियात आकर्षक स्थान प्रस्थापित करणाऱ्या भारताचा आर्थिक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात ७.५ टक्के राहील, अशी आशा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने
