लंडन : ब्रिटिश सरकार १८ मार्चपासून बहुतांश श्रेणीच्या अर्जासाठी व्हिसा शुल्क वाढविण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाचा फटका हजारो भारतीयांना बसेल.
जानेवारीतच व्हिसा शुल्कात बदल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, बहुतांश श्रेणीतील अर्जासाठी शुल्कात दोन टक्के वाढ होईल. यात प्रवास, नोकरी किंवा शिक्षणासाठी व्हिसा मिळविण्यास इच्छुकांचे अर्ज असतील. याशिवाय राष्ट्रीयत्व आणि निवास व्हिसा अर्जासाठीच्या शुल्कात २५ टक्के वाढ होईल. या शुल्कवाढीमळे सीमा, स्थलांतरित आणि नागरिकत्व यावर होणारा खर्च कमी होईल.
मागच्या वर्षी कुशल कामगारांना मंजूर करण्यात आलेल्या एकूण व्हिसांच्या संख्येत सर्वाधिक संख्या भारतीयांची (९२,०६२) आहे. कुटुंब आणि पती-पत्नींसाठी व्हिसाचे शुल्कही भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. बेमुदत वास्तव्य किंवा निवासी अर्जासाठीच्या शुल्क १५०० पौंडवरून १८७५ पौंड असेल.
ब्रिटनच्या व्हिसा शुल्कवाढीचा फटका बसणार भारतीयांना
ब्रिटिश सरकार १८ मार्चपासून बहुतांश श्रेणीच्या अर्जासाठी व्हिसा शुल्क वाढविण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाचा फटका हजारो भारतीयांना बसेल.
By admin | Updated: March 7, 2016 21:49 IST2016-03-07T21:49:32+5:302016-03-07T21:49:32+5:30
ब्रिटिश सरकार १८ मार्चपासून बहुतांश श्रेणीच्या अर्जासाठी व्हिसा शुल्क वाढविण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाचा फटका हजारो भारतीयांना बसेल.
