Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय शेअर बाजारांत पुन्हा गडगडाट

भारतीय शेअर बाजारांत पुन्हा गडगडाट

दोन सत्रांच्या तेजीनंतर शेअर बाजारांनी मंगळवारी पुन्हा एकदा जोराची आपटी खाल्ली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६३0 अंकांनी घसरून २७ हजार

By admin | Updated: May 13, 2015 00:53 IST2015-05-13T00:53:27+5:302015-05-13T00:53:27+5:30

दोन सत्रांच्या तेजीनंतर शेअर बाजारांनी मंगळवारी पुन्हा एकदा जोराची आपटी खाल्ली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६३0 अंकांनी घसरून २७ हजार

Indian stock markets thunder again | भारतीय शेअर बाजारांत पुन्हा गडगडाट

भारतीय शेअर बाजारांत पुन्हा गडगडाट

मुंबई : दोन सत्रांच्या तेजीनंतर शेअर बाजारांनी मंगळवारी पुन्हा एकदा जोराची आपटी खाल्ली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६३0 अंकांनी घसरून २७ हजार अंकांच्या खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९८.५0 अंकांनी घसरला.
ब्रोकरांनी सांगितले की, मॅट कराबाबत सरकारने खुलासा केल्यानंतरही स्थिती स्पष्ट झालेली नाही. तसेच काही सुधारणा विधेयके लोकसभेत अडकून पडली आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. याशिवाय जागतिक बाँड बाजारातील नरमाईचा परिणामही बाजारावर झाला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी नरमाईने उघडला होता. त्यानंतर तो आणखी घसरत राहिला. लवकरच तो २७ हजार अंकांच्या खाली आला. एका क्षणी तो २६,८३७.३९ अंकांपर्यंत घसरला होता. सत्र अखेरीस तो ६२९.८२ अंकांनी अथवा २.२९ टक्क्यांनी घसरून २६,८७७.४८ अंकांवर बंद झाला. आधीच्या दोन सत्रांत मिळून सेन्सेक्सने ९0८.१९ अंकांची वाढ मिळविली होती.
५0 कंपन्यांच्या समभागाचा समावेश असलेला व्यापक आधारावरील निफ्टी ८२00 रुपयांच्या खाली आला. १९८.३0 अंक अथवा २.३८ टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ८,१२६.९५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३0 पैकी २८ कंपन्यांचे समभाग घसरले. डॉ. रेड्डीज आणि हीरो मोटोकॉर्प या दोन कंपन्यांचे समभाग वाढू शकले.
घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत भेल, वेदांता, आयसीआयसीआय बँक, टाटा पॉवर, एलअँडटी, अ‍ॅक्सिस बँक, हिंदाल्को, एसबीआय, आरआयएल, ओएनजीसी आणि टाटा मोटर्स यांचा समावेश आहे.
बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,९६२ कंपन्यांचे समभाग घसरले. ७४६ कंपन्यांचे समभाग वाढले. ९५ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल वाढून ३,१४२.७0 कोटींवर गेली. (वृत्तसंस्था)


 

Web Title: Indian stock markets thunder again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.