Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय रेल्वे व लष्कर टॉप-१0 रोजगार निर्माते

भारतीय रेल्वे व लष्कर टॉप-१0 रोजगार निर्माते

भारतीय लष्कर आणि भारतीय रेल्वे या भारतातील दोन प्रमुख संस्थांचा जगातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या पहिल्या १० संस्थांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

By admin | Updated: June 28, 2015 21:37 IST2015-06-28T21:37:38+5:302015-06-28T21:37:53+5:30

भारतीय लष्कर आणि भारतीय रेल्वे या भारतातील दोन प्रमुख संस्थांचा जगातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या पहिल्या १० संस्थांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Indian Railway and Army Top-10 Employment Manufacturers | भारतीय रेल्वे व लष्कर टॉप-१0 रोजगार निर्माते

भारतीय रेल्वे व लष्कर टॉप-१0 रोजगार निर्माते

नवी दिल्ली : भारतीय लष्कर आणि भारतीय रेल्वे या भारतातील दोन प्रमुख संस्थांचा जगातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या पहिल्या १० संस्थांमध्ये समावेश करण्यात आला आहे. लष्कर आणि रेल्वे मिळून २७ लाख लोकांना रोजगार देत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी नियोक्ता असलेली संस्था असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, या पाहणीत मात्र रोजगार देण्याच्या बाबतीत भारतीय रेल्वे जगात आठव्या स्थानी आहे. रेल्वेत १४ लाख कर्मचारी आहेत. रेल्वेपाठोपाठ भारतीय सशस्त्र दलांचा नववा क्रमांक लागतो. भारतीय सशस्त्र दलांनी १३ लाख लोकांना रोजगार दिला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार अमेरिकेचे संरक्षण खाते जगात सर्वाधिक रोजगार देणारा विभाग आहे. त्यात ३२ लाख कर्मचारी कामावर आहेत. त्याखालोखाल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा दुसरा क्रमांक लागतो. चीनच्या या लष्करात २३ लाख जवान आहेत. तर वॉलमार्ट या सुपर मार्केट क्षेत्रातील अमेरिकन कंपनीने २१ लाख कर्मचाऱ्यांना नोकरी देत तिसरे स्थान पटकावले आहे.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या पाहणीनुसार, रोजगार देण्याच्या बाबतीत मॅकडोनॉल्ड चौथ्या स्थानी आहे. या संस्थेत १९ लाख कर्मचारी आहेत. तथापि, या संस्थेचे बहुतांश रेस्टॉरंट हे फ्रेंचायसी आहेत. या फ्रेंचायसीतील कर्मचाऱ्यांना वगळले तर मॅकडोनॉल्डमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ ४,२०,००० एवढी राहते, असे या अहवालात स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसला रोजगाराच्या बाबतीत पाचवे स्थान मिळाले आहे. तेथे १७ लाख कर्मचारी आहेत. तर १६ लाख कर्मचाऱ्यांसह चीन सरकारद्वारा चालविण्यात येणारे चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन हे सहाव्या स्थानी आहे.
दुसरी एक चिनी कंपनी स्टेट ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ चायना १५ लाख कर्मचाऱ्यांना रोजगार देत सातव्या स्थानी आहे. फॉक्सकॉन नावाने ओळखल्या जाणाऱ्या होन हाई प्रेसिसन फॅक्टरीने दहावे स्थान पटकावले आहे. या कंपनीत १२ लाख कर्मचारी आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian Railway and Army Top-10 Employment Manufacturers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.