वॉशिंग्टन : भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग यावर्षी ६.३ आणि पुढील वर्षी साडेसहा टक्के असण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केली असून हा दर चीनच्या नियोजित दरापेक्षा जास्त असेल, असे म्हटले. केंद्रातील नव्या सरकारने हाती घेतलेल्या सुधारणा ‘आश्वासक’ असल्या तरी त्यांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे यावर भर देण्यात आला आहे.
२०१४ मध्ये भारताचा वाढीचा वेग ५.८ टक्के असताना चीनचा ७.४ टक्के होता व २०१३ मध्ये चीनचा हाच दर ७.८ टक्के असताना भारताचा ५ टक्के होता, असे आयएमएफने प्रसिद्धीस दिलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे. २०१५ आणि २०१६ मध्ये भारताचे लक्ष्य अनुक्रमे ६.३ व ६.५ टक्के असून चीनच्या नियोजित ६.३ टक्क्याला तो मागे टाकण्याची शक्यता आहे, असे त्यात म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुधारणांच्या योजना या आश्वासक आहेत. आता आम्हाला बघायचे आहे, ते हे की, त्यांची अंमलबजावणी कशी होते, असे आयएमएफच्या संशोधन विभागाचे उपसंचालक गियान मारिया मिलेसी-फेरेट्टी यांनी म्हटले. मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांचे भाकीत करणे अवघड आहे, कारण त्या रचनात्मक सुधारणा आहेत व त्या मध्यम कालावधीत हळूहळू वाढत आहेत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या अहवालानुसार भारतात विकासाचे भाकीत व्यापक अर्थाने बदलणारे नाही. तथापि वाढीचा वेग मात्र वाढेल. (वृत्तसंस्था)
४बीजिंग : चीनचा आर्थिक वृद्धीदर २०१४ मध्ये ७.४ टक्के राहिला. सरकारी लक्ष्याच्या तुलनेत यात घट झाली असून हा दर २४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेत मंदी असतानाच चीन सरकारने आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली.
४एकूण घरगुती उत्पादनाचा ७.४ टक्के वृद्धीदर अधिकृत लक्ष्याच्या तुलनेत कमी राहिला. चीन सरकारने २०१४ साठी ७.५ टक्के एवढे आर्थिक वृद्धी लक्ष्य निश्चित केले होते. तथापि, सरकार गृहनिर्माण क्षेत्रात मंदी, देशांतर्गत मागणीत घट व कमजोर जागतिक सुधार या समस्यांचा निपटारा करत अर्थव्यवस्था पटरीवर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
भारतीय अर्थव्यवस्था पुढील वर्षी चीनला पछाडणार
भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग यावर्षी ६.३ आणि पुढील वर्षी साडेसहा टक्के असण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केली
By admin | Updated: January 21, 2015 00:01 IST2015-01-21T00:01:41+5:302015-01-21T00:01:41+5:30