ग्रेटर नोएडा : देशांतर्गत आर्थिक घडामोडींमुळे आगामी आर्थिक वर्षात बसची विक्री १२ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बसच्या उलाढालीत गेल्या ३० महिन्यांपासून मंदीचे वातावरण आहे.
वाहन उद्योग संघटना सियामने सांगितले की, जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण कार्यक्रमांतर्गत येत्या आर्थिक वर्षात बसच्या पुरवठ्यात झपाट्याने वाढ होईल, याचा उद्योग वृद्धीत हातभार लागेल.
सियामचे उपमहासंचालक सुगातो सेन म्हणाले की, ‘आर्थिक वर्ष २०१५-१६ यादरम्यान, व्यापारात १०-१२ टक्क्यांपर्यंत तेजी येण्याची शक्यता आहे. गेल्या ३० महिन्यांपासून व्यापाराच्या पातळीवर सुस्त वातावरण आहे; मात्र झपाट्याने बदल असलेल्या आर्थिक घडामोडींमुळे बस उलाढालीत वाढ होणे अपेक्षित आहे.’ चौथ्या बस व विशेष वाहन प्रदर्शनावेळी बोलताना सेन यांनी येथे नवी उत्पादने व तंत्रज्ञान सादर केले जाईल, असे सांगितले.
सेन यांनी सांगितले की, बस श्रेणीत एक बदल दिसणे अपेक्षित आहे. या प्रदर्शनामुळे बसच्या भावी खरेदीदारांना यात होत असलेले नवनवीन तांत्रिक बदल समजून घेण्यास मदत होईल. (वृत्तसंस्था)
भारतीय बस उद्योग १२ टक्क्यांनी वाढला
देशांतर्गत आर्थिक घडामोडींमुळे आगामी आर्थिक वर्षात बसची विक्री १२ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बसच्या उलाढालीत गेल्या ३० महिन्यांपासून मंदीचे वातावरण आहे.
By admin | Updated: January 17, 2015 01:07 IST2015-01-17T01:07:28+5:302015-01-17T01:07:28+5:30
देशांतर्गत आर्थिक घडामोडींमुळे आगामी आर्थिक वर्षात बसची विक्री १२ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बसच्या उलाढालीत गेल्या ३० महिन्यांपासून मंदीचे वातावरण आहे.
