Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत-अमेरिकेतील व्यापार ५०० अब्ज डॉलरचा होणार

भारत-अमेरिकेतील व्यापार ५०० अब्ज डॉलरचा होणार

भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार येत्या काही वर्षांत पाच पट वाढून ५०० अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे.

By admin | Updated: June 4, 2015 23:16 IST2015-06-04T23:16:24+5:302015-06-04T23:16:24+5:30

भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार येत्या काही वर्षांत पाच पट वाढून ५०० अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे.

India-US trade will be worth $ 500 billion | भारत-अमेरिकेतील व्यापार ५०० अब्ज डॉलरचा होणार

भारत-अमेरिकेतील व्यापार ५०० अब्ज डॉलरचा होणार

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार येत्या काही वर्षांत पाच पट वाढून ५०० अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. हा व्यापार सध्या १०० अब्ज डॉलरचा आहे. ही माहिती गुरुवारी अमेरिका-भारत व्यापार परिषदेने (यूएसआयबीसी) दिली.
यूएसआयबीसीचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी म्हटले आहे की यूएसआयबीसीच्या सदस्य कंपन्या भारत आणि अमेरिकन अर्थव्यवस्था गुंतवणुकीसाठी आकर्षक बनविणे, रोजगार निर्मिती आणि नागरिकांच्या समृद्धीसाठी प्रयत्न करून पुढाकार घेत आहे.
दरम्यान, भारताने व्यापार सुगमतेसाठी आणखी पावले टाकावीत, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. जागतिक व्यापार संघटनेतील (डब्ल्यूटीओ) अमेरिकेचे प्रतिनिधी ख्रिस्तोफर विल्सन यांनी जिनिव्हात म्हटले की, भारत सरकारची सकारात्मक भूमिका आम्ही बघितली आहे. तो आणखी बरेच काही करू शकतो.

Web Title: India-US trade will be worth $ 500 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.