जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत एखाद्या क्षेत्राचा विकास होताना भौगोलिक मर्यादा तोडत संबंधित क्षेत्र वेगाने विकसित कसे होईल याचा विचार होणे गरजेचे आहे. एखाद्या क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी एखाद-दोन देश नव्हे तर त्या क्षेत्राशी संबंधित अशा सर्व देशांनी एकत्रित येण्याची इच्छाशक्ती दाखविली तर त्या क्षेत्राच्या विकासाला कसे जागतिक परिमाण लाभते, याचा प्रत्यय नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या ‘इंटरनॅशनल कॉटन एडव्हायझरी कमिटी’च्या वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने आला. कापूस, उत्पादन, बाजारपेठ, आव्हाने, समस्या आणि ट्रेन्ड या संदर्भात या संमेलनात व्यापक उहापोह झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे, वस्त्रोद्योग निर्मितीत अग्रेसर अशा तुर्कस्तानच्या प्रतिनिधींची उपस्थिती आणि सहभागही लक्षवेधी ठरला. तुर्कस्तान निर्यात संघटनेचे अध्यक्ष सुलेमान कोजासर्थ यांच्याशी या निमित्ताने केलेली ही बातचीत...ल्लया संमेलनाचे वैशिष्ट्य आणि तुमचा सहभाग याबद्दल काय सांगाल ?
- जगभरातील कापूस उत्पादक, कापूस प्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग निर्माते, तंत्रज्ञ यांचे एकत्रित असे हे संमलेन आहे. हा वार्षिक उपक्रम असून यंदाचे हे ७४ वे वर्ष आहे. या निमित्ताने कापसाच्या उत्पादनाची जागतिक स्थिती, आव्हाने, समस्या, नवे ट्रेन्डस् अशा सर्व विषयांवर सखोल चर्चा होते आणि यातूनच कापूस हा एक उद्योग म्हणून जागतिक पातळीवर कसा विकसित होईल, याची दिशा निश्चित होते.
ल्लकापसाच्या बाजारपेठेचे जागतिक चित्र काय आहे ?
- २००८ च्या जागतिक मंदीचा मोठा फटका या क्षेत्राला बसला आहे. अनेक क्षेत्र आता मंदीच्या फेऱ्यातून सावरताना दिसत असली तरी कापसाच्या क्षेत्रात अद्याप फारसे सकारात्मक चित्र नाही. जागतिक बाजारात स्थिती फारशी अनुकूल नाही. तेल आणि एकूणच कमोडिटीच्या किमती कमालीच्या घसरल्या आहेत. याचा थेट फटका वस्त्रोद्योग व्यवसायाला बसला आहे. २०१३ यावर्षामध्ये वस्त्रोद्योगाच्या विकासदरात ५ टक्के घसरण झाली तर २०१४ मध्ये हे प्रमाण आणखी घसरत ३.८ टक्क्यांचा नीचांक नोंदविला. उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे तर, जागतिक पातळीवर २०११/१२ मध्ये दोन कोटी ७८ लाख टन कापसाचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर, पुढच्या काही वर्षात सातत्याने घसरणच झाल्याचे दिसते. २०११ च्या तुलनेत २०१५/१६ या वर्षात आतापर्यंत ९ टक्क्यांची घसरण होत उत्पादन दोन कोटी ३९ लाख टनावर आले आहे. कापसाचे उत्पादन करणाऱ्या अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान या देशातून कापसाच्या प्रति एकर उत्पादनातही घट झाली आहे. जागतिक स्थितीत सुधारणा झाल्यास त्याचे परिणाम कमोडिटी आणि पर्यायाने कापसाच्या बाजारवर दिसून येतील. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेच्या मते (आयएमएफ) २०१५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास हा २.५ टक्के तर २०१६ मध्ये ३ टक्के दराने होणे अपेक्षित आहे. अर्थात, आजच्या स्थितीच्या अनुषंगाने हे भाकीत आहे. पण, जागतिक स्थितीत अस्थिरता राहिली तर परिस्थिती खालावण्याची शक्यता आहे.
ल्लपरिस्थिती कधी सुधारेल असे वाटते ?
- परिस्थिती सुधारण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. मंदीच्या या काळात ग्राहकांकडून घटणाऱ्या मागणीचा फटका या क्षेत्राला बसत आहे.
ल्लकापसाच्या बाजारात भारत कायमच अग्रेसर राहिला आहे. जागतिक पातळीवरील चित्र कसे आहे ?
- कापसाच्या निर्यातीत भारत हा जगातील एक अग्रगण्य देश असून कापसाच्या जागतिक निर्यातीत २०१३/१४ या वर्षात वीस लाख टनाच्या निर्यातीस, २५ टक्के निर्यात एकट्या भारताने केली होती. मधल्या दोनवर्षात मंदीमुळे हे प्रमाण घटले असले तरी, २०१५/१६ या वर्षात कापसाच्या निर्यातीत ३३ टक्क्यांनी वाढ अपेक्षित असून दहा लाख २० हजार टन इतकी निर्यात अपेक्षित आहे.
ल्लतुर्कस्तान आणि भारत यांच्यातील व्यापार उद्दीमाची स्थिती काय आहे?
- तुर्कस्तान आणि भारत यांच्यादरम्यान विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर व्यापार उद्दीमाची उलाढाल होते. या संमेलनाच्या निमित्ताने कापसाबद्दल सांगायचे तर, २०१४ मध्ये आम्ही भारताकडून ७ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याची कापूस व अनुषंगिक घटकाची आयात केली तर, ६० कोटी अमेरिकी डॉलर इतक्या मूल्याच्या वस्त्राची निर्यात केली. तर २०१५ मध्ये ५ अब्ज अमेरिकी डॉलरची आयात केली. निर्यातीची आकडेवारी २०१४ इतकीच आहे.
ल्लतुर्कस्थान आणि आजूबाजूच्या देशातील अस्थिरतेचा परिणाम होत आहे ?
- सिरिया, उत्तर युक्रेन, रशिया आदी प्रातांतील अस्थिरतेचे मोठे पडसाद उमटत आहेत. पण, ठामपणे सांगावेसे वाटते की , कोणत्याही देशाने कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला थारा देऊ नये. दहशतवादामुळे विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसते. एक देश म्हणून आम्ही कायमच शांततेची आणि विकासाची भूमिका घेतली आहे. तसेच, दहशतवादाला आम्ही ठामपणे निषेध करतो.
‘वस्त्रोद्योगात अग्रेसर होण्यासाठी भारत-तुर्कस्तानचे बंध दृढ हवे’
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत एखाद्या क्षेत्राचा विकास होताना भौगोलिक मर्यादा तोडत संबंधित क्षेत्र वेगाने विकसित कसे होईल याचा विचार होणे गरजेचे आहे.
By admin | Updated: December 8, 2015 23:41 IST2015-12-08T23:41:15+5:302015-12-08T23:41:15+5:30
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत एखाद्या क्षेत्राचा विकास होताना भौगोलिक मर्यादा तोडत संबंधित क्षेत्र वेगाने विकसित कसे होईल याचा विचार होणे गरजेचे आहे.
