Lokmat Money > बिझनेस न्यूज > विदेशी मनिआॅर्डरच्या बाबतीत भारत अव्वल

विदेशी मनिआॅर्डरच्या बाबतीत भारत अव्वल

२0१५ मध्ये विदेशातून मनिआॅर्डरद्वारे पैसे प्राप्त करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानी राहिला. भारत अव्वल स्थानी असला तरी या वर्षात भारताच्या मनिआॅर्डरमध्ये तब्बल एक

By admin | Updated: April 15, 2016 03:12 IST2016-04-15T03:12:27+5:302016-04-15T03:12:27+5:30

२0१५ मध्ये विदेशातून मनिआॅर्डरद्वारे पैसे प्राप्त करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानी राहिला. भारत अव्वल स्थानी असला तरी या वर्षात भारताच्या मनिआॅर्डरमध्ये तब्बल एक

India tops the list of overseas money orders | विदेशी मनिआॅर्डरच्या बाबतीत भारत अव्वल

विदेशी मनिआॅर्डरच्या बाबतीत भारत अव्वल

वॉशिंग्टन : २0१५ मध्ये विदेशातून मनिआॅर्डरद्वारे पैसे प्राप्त करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानी राहिला. भारत अव्वल स्थानी असला तरी या वर्षात भारताच्या मनिआॅर्डरमध्ये तब्बल एक अब्ज डॉलरची घटही झाली आहे. जागतिक बँकेने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली.
जागतिक बँकेने ‘मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट ब्रीफ’ नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, २00९ नंतर विदेशातून भारतात येणाऱ्या पैशांत प्रथमच घट झाली आहे. २0१५ मध्ये भारताला विदेशातून ६९ अब्ज डॉलरच्या मनिआॅर्डर मिळाल्या. २0१४ मध्ये हा आकडा ७0 अब्ज डॉलर होता. याचाच अर्थ मनिआॅर्डरमध्ये २.१ टक्क्यांची घट झाली आहे. २0१५ मध्ये चीनला ६४ अब्ज डॉलर, फिलिपिन्सला २८ अब्ज डॉलर, मेक्सिकोला २५ अब्ज डॉलर व नायजेरियाला २१ अब्ज डॉलरच्या मनिआॅर्डर मिळाल्या.

विकसनशील देशांना मिळणाऱ्या मनिआॅर्डरमध्ये 0.४ टक्के वाढ झाली आहे. ४३१.६ अब्ज डॉलरच्या मनिआॅर्डर या देशांना मिळाल्या. २0१४ मध्ये हा आकडा ४३0 अब्ज डॉलर होता. आर्थिक संकटानंतर ही सर्वाधिक कमी वार्षिक वाढ आहे.
विकसित देशांना २0१५ मध्ये ५८१.६ अब्ज डॉलरच्या मनिआॅर्डर मिळाल्या. २0१४ मध्ये हा आकडा ५९२ अब्ज डॉलर होता. याचाच अर्थ या देशांना मिळालेल्या मनिआॅर्डरमध्ये १.७ टक्के घट झाली आहे.

Web Title: India tops the list of overseas money orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.