वॉशिंग्टन : भारतात धोरणे ठरविणाऱ्या यंत्रणांनी महागाईवर नियंत्रण, बाह्य स्थैर्यात सुधारणा, तसेच महसुली मजबुती आणण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी जोरदार पावले उचलली आहेत. त्यामुळे भारत आर्थिक मजबुतीच्या दिशेने झपाट्याने प्रगती करीत आहे, असे प्रशंसोद्गार अमेरिकेने काढले आहेत.
अमेरिकेचे वित्त उपमंत्री नॅथन शीटस् यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे आपली आर्थिक वृद्धी गतिमान करण्यात भारताला मदत झाली आहे. त्याचबरोबर धोरणात्मक सुधारणांच्या माध्यमातूनही भारताने चांगली पावले उचलली आहेत. त्याचा भारताला लाभ मिळताना दिसून येत आहे. भारताच्या व्यापक आर्थिक स्थैर्याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
‘भारत आर्थिक मजबुतीच्या दिशेने’
भारतात धोरणे ठरविणाऱ्या यंत्रणांनी महागाईवर नियंत्रण, बाह्य स्थैर्यात सुधारणा, तसेच महसुली मजबुती आणण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी जोरदार पावले उचलली आहेत.
By admin | Updated: April 8, 2016 22:34 IST2016-04-08T22:34:12+5:302016-04-08T22:34:12+5:30
भारतात धोरणे ठरविणाऱ्या यंत्रणांनी महागाईवर नियंत्रण, बाह्य स्थैर्यात सुधारणा, तसेच महसुली मजबुती आणण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी जोरदार पावले उचलली आहेत.
