नवी दिल्ली : परकीय वित्तसंस्थांनी आशियामध्ये गुंतवणूक करताना भारताला सर्वाधिक पसंती दिलेली दिसते. हॉँगकॉँग अॅण्ड शांघाय र्बंकींग कॉर्पाेरेशन (एचएसबीसी)ने जाहीर केलेल्या अहवालात हे उघड झाले आहे. चालू वर्षात (२६ मे पर्यंत) या संस्थांनी भारतात ७.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. जगभर वित्तीय सेवा पुरविणार्या एचएसबीसीने परकीय वित्तसंस्थांच्या आशियातील गुंतवणुकीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्या अहवालामधून भारताला सर्वाधिक पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे. परकीय वित्तसंस्थांची आशियातील गुंतवणुकीत भारताला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. तैवान दुसर्या स्थानावर असून इंडोनेशियाला तिसर्या क्रमांकाची पसंती लाभली असल्याचे अहवालात म्हटले आहे. मे महिन्यात परकीय वित्तसंस्थांनी भारतात २.३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. जानेवारपासून २६ मे पर्यंत या वित्तसंस्थांनी भारतात ७.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या काळात आशियामध्ये परकीय वित्तसंस्थांनी १८.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. याचाच अर्थ या वित्तसंस्थांनी एकटतया भारतात ४१.४८ टक्के गुंतवणूक केली आहे. भारतामधील गुंतवणुकीवर मिळत असलेला चांगला परतावा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या जलद विकासाची असलेली अपेक्षा आणि नेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आलेले नवीन सरकार यामुळे परकीय वित्तसंस्थांची भारताला अधिक पसंती लाभली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
परकीय वित्तसंस्थांची आशियात भारताला पसंती
परकीय वित्तसंस्थांनी आशियामध्ये गुंतवणूक करताना भारताला सर्वाधिक पसंती दिलेली दिसते. हॉँगकॉँग अॅण्ड शांघाय र्बंकींग कॉर्पाेरेशन (एचएसबीसी)ने जाहीर
By admin | Updated: May 31, 2014 06:30 IST2014-05-31T06:30:23+5:302014-05-31T06:30:23+5:30
परकीय वित्तसंस्थांनी आशियामध्ये गुंतवणूक करताना भारताला सर्वाधिक पसंती दिलेली दिसते. हॉँगकॉँग अॅण्ड शांघाय र्बंकींग कॉर्पाेरेशन (एचएसबीसी)ने जाहीर
