सिंगापूर/नवी दिल्ली : आशियाई खनिज तेलाच्या बाजारात जपानला मागे टाकून भारत आणि चीन हे नवे दबदबा असलेले देश बनले आहे. या दोन्ही देशांच्या तेल वापरामुळे जगातील तेल बाजारातील चित्रही बदलत आहे.
१९९0 पासून भारत आणि चीनचा खनिज तेल वापर तिपटीने वाढला आहे. जगातील एकूण तेल वापराच्या १६ टक्के तेल हे दोन्ही देश आता वापरू लागले आहेत. हे प्रमाण अमेरिका वापरत असलेल्या तेलाच्या जवळपास येताना दिसत आहे. अमेरिका जगातील एकूण तेल वापराच्या २0 टक्के तेल वापरते.
दुबई मर्कंटाईल एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक ओवेन जॉन्सन यांनी सांगितले की, आशियाई तेल बाजार प्रचंड वेगाने बदलत आहे. २0४0 सालापर्यंत चीन आणि भारताचा तेल वापर दुप्पट होईल. भारताची इंडियन आॅईल कॉर्पोरेशन (आयओसी) ही कंपनी आशियातील एक मोठी व्यावसायिक कंपनी म्हणून समोर येत आहे. ही कंपनी ११ तेल शुद्धीकरण प्रकल्प चालविते.
तेलाच्या किमती घसरल्या
सौदी अरेबियाने तेल उत्पादन घटविण्यास नकार दिल्यानंतर बुधवारी आशियाई बाजारात तेलाच्या किमती पुन्हा घसरल्या. अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे एप्रिल डिलिव्हरीसाठीचे दर ५६ सेंटांनी घसरून ३१.३१ डॉलर प्रतिबॅरल झाले. ब्रेंट क्रूडचे दर ३३ सेंटांनी घसरून ३२.९४ डॉलर प्रतिबॅरल झाले.
अस्थैर्य वाढले
बदलत्या परिस्थितीत तेल बाजारातील अस्थैर्य वाढल्याचे जेबीसी एनर्जी एशियाचे संचालक रिचर्ड गोरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, जानेवारी महिन्यात चीनच्या एका रिफायनरीने एक तेल कार्गो खरेदी केला होता. तथापि, त्याची डिलिव्हरी करून घेण्यास कंपनी अपयशी ठरली. त्यामुळे हा कार्गो नव्याने विक्री करावा लागला. या महिन्यात आणखी एका चिनी कंपनीने एक ६८0 दशलक्ष डॉलरचे रशियन तेल खरेदी केले होते. हा व्यवहारही कंपनीला पूर्ण करता आला नाही.
भारत, चीनने बदलले तेल बाजाराचे चित्र
आशियाई खनिज तेलाच्या बाजारात जपानला मागे टाकून भारत आणि चीन हे नवे दबदबा असलेले देश बनले आहे. या दोन्ही देशांच्या तेल वापरामुळे जगातील तेल बाजारातील
By admin | Updated: February 25, 2016 03:13 IST2016-02-25T03:13:39+5:302016-02-25T03:13:39+5:30
आशियाई खनिज तेलाच्या बाजारात जपानला मागे टाकून भारत आणि चीन हे नवे दबदबा असलेले देश बनले आहे. या दोन्ही देशांच्या तेल वापरामुळे जगातील तेल बाजारातील
