Lokmat Money > बिझनेस न्यूज > आदिवासींसाठी हवे स्वतंत्र विद्यापीठ : पिचड

आदिवासींसाठी हवे स्वतंत्र विद्यापीठ : पिचड

विद्यापीठात सर्व प्रकारचे शिक्षण : आश्रमशाळांमध्ये स्वतंत्र शिक्षण कक्ष : डॉ़ गारे यांच्या पुस्तकांचे पुनर्मुद्रण

By admin | Updated: September 6, 2014 00:38 IST2014-09-05T20:38:27+5:302014-09-06T00:38:11+5:30

विद्यापीठात सर्व प्रकारचे शिक्षण : आश्रमशाळांमध्ये स्वतंत्र शिक्षण कक्ष : डॉ़ गारे यांच्या पुस्तकांचे पुनर्मुद्रण

An independent university for tribals: Pichad | आदिवासींसाठी हवे स्वतंत्र विद्यापीठ : पिचड

आदिवासींसाठी हवे स्वतंत्र विद्यापीठ : पिचड

विद्यापीठात सर्व प्रकारचे शिक्षण : आश्रमशाळांमध्ये स्वतंत्र शिक्षण कक्ष : डॉ़ गारे यांच्या पुस्तकांचे पुनर्मुद्रण
नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थीही आता सर्वोत्तम गुण मिळवून प्रगती करीत असून, त्यातील काहींनी आयएएसचे स्वप्नदेखील पूर्ण केले आहे़ मात्र आजही अनेक आदिवासींची मुले शिक्षणापासून वंचित आहेत़ मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र एकलव्य विद्यापीठाची मागणी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे केल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केले़ आदिवासी विकास विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते़
पुढे बोलताना ते म्हणाले की, मध्य प्रदेशात आदिवासींसाठी स्वतंत्र विद्यापीठ आहे़ त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीदेखील स्वतंत्र एकलव्य विद्यापीठ तयार करण्यात यावे या विद्यापीठात आदिवासींच्या मुलांना सर्व प्रकारची तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण मिळण्याची सुविधा असावी, अशी मागणी राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे़
आदिवासी समाजावरील डॉ़ गोविंद गारे यांची पुस्तके पुनर्मुद्रित करण्याची परवानगी मंत्रिमंडळाकडून घेण्यात आली असून, त्यासाठी ३़७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ ही सर्व पुस्तके आश्रमशाळांमध्ये मोफ त वितरित केली जाणार आहेत़ शाळा आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये फ रक आहे़ आश्रमशाळातील याच शिक्षकांच्या मेहनतीमुळेच आज हे आदिवासी विद्यार्थी यश मिळवू शकले़ आश्रमशाळा शिक्षकांनी ज्ञानाची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या हातात आधुनिक असे संगणक, टॅब, तंत्रशिक्षण द्या, असे आवाहनही आमदार पिचड यांनी केले़
राष्ट्रपतींच्या हस्ते आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त झालेले डॉ़ विनायक तुमराम यांनी यावेळी सांगितले की, आदिवासी समाज आजही त्याच अवस्थेत असून त्याला बाहेर काढण्याची शिक्षकांवर फ ार मोठी जबाबदारी आहे़ शिक्षक जगला तरच देश जगेल, कारण सर्वात मोठा आदर्श हा शिक्षकच निर्माण करू शकतात़ आश्रमशाळा शिक्षकांवर आरोप होऊ न देण्याची मोठी जबाबदारी आहे़ या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे मोठे व विकसित करून या आरोपांना तुम्ही कृतीतून प्रतिउत्तर द्या, असे डॉ़ तुमराम म्हणाले़
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नरहरी झिरवाळ, मधुकर लांडे, आदिवासी विकास आयुक्त बाजीराव जाधव, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदिवासी सेवक डॉ़ विनायक तुमराम, माजी आमदार शिवराम झोले आदिंसह मान्यवर उपस्थित होते़ प्रास्ताविक नाशिक जिल्हा आदिवासी विकासाचे अपर आयुक्त अशोक लोखंडे यांनी केले़ ठाणे जिल्हा आदिवासी विकास अपर आयुक्त सुधीर पाटील यांनी आभार मानले़(प्रतिनिधी)

--इन्फ ो--
आश्रमशाळेतील राज्यस्तर व नाशिक विभागस्तरातील विद्यार्थी (मुले) : - प्रथम - गुणाजी काशीनाथ खेत्री, भेगुसावरपाडा, ता़ सुरगाणा, जि़ नाशिक (९१ टक्के), द्वितीय - राहुल देवराम गायकवाड, चिंचला, ता़ सुरगाणा, जि़ नाशिक (९०़२० टक्के), तृतीय - विशाल भुवसिंग चव्हाण, शिरपूर, ता़ शिरपूर, जि़ धुळे (८९़८० टक्के), मुली :- प्रथम - संगीता निवृत्ती गावित, भेगुसावरपाडा, ता़ सुरगाणा, जि़ नाशिक (८९़४० टक्के), द्वितीय - रेखा यशवंत चौधरी, अलंगुण, ता़ सुरगाणा, जि़ नाशिक (८९ टक्के), तृतीय - दीपाली जयवंत थविल, अलंगुण, ता़ सुरगाणा, जि़ नाशिक (८८़२० टक्के),

--इन्फ ो--
* आश्रमशाळांमध्ये स्वतंत्र शिक्षण कक्षासाठी १९६१ पदांना मंत्रिमंडळाची मान्यता़
* आश्रमशाळा शिक्षक व मुख्याध्यापकांना पदोन्नती.
* आश्रमशाळांसाठी ५५६ स्त्री अधीक्षिका तसेच ५५६ सुरक्षारक्षकाची भरती.
* राज्यात ४ एकलव्य निवासी शाळा.
* आश्रमशाळा मुख्याध्यापक व गृहपालक यांना एकावेळी ५० हजार रुपये खर्च करता येणार.
* आश्रमशाळांच्या वर्गवाढीला परवानगी.
* राज्यातील काही आश्रमशाळांची निवड करून तेथील विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी व व्यवसायिक शिक्षण.

Web Title: An independent university for tribals: Pichad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.