Lokmat Money > बिझनेस न्यूज > वर्षारंभी खिशाला फोडणी! एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ; मुंबईतील नवा दर जाणून घ्या

वर्षारंभी खिशाला फोडणी! एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ; मुंबईतील नवा दर जाणून घ्या

देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो.

By देवेश फडके | Updated: January 1, 2021 12:28 IST2021-01-01T12:22:44+5:302021-01-01T12:28:04+5:30

देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो.

increase in the price of LPG gas cylinders Find out the new rates in Mumbai | वर्षारंभी खिशाला फोडणी! एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ; मुंबईतील नवा दर जाणून घ्या

वर्षारंभी खिशाला फोडणी! एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ; मुंबईतील नवा दर जाणून घ्या

Highlightsएलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ१९ किलोचा सिलेंडर मुंबईत १७ रुपयांनी महागकोलकाता येथे २२ रुपयांनी, तर दिल्लीतही १७ रुपयांनी सिलेंडर महागला

नवी दिल्ली : देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून, १९ किलो सिलेंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. यानंतर मुंबईत १९ किलोचा सिलेंडर १७ रुपयांनी महाग झाला असून, आता एलपीजीच्या या सिलेंडरसाठी १२९७.५० रुपये मोजावे लागतील. 

तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. प्रत्येक राज्यातील करांनुसार, घरगुती सिलेंडरचा दर वेगवेगळा असतो. मिळालेल्या माहितीनुसार, १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी मुंबईत ६९४ रुपये, कोलकातामध्ये ७१० रुपये आणि राजधानी दिल्लीत ६९४ रुपये आकारले जातात. 

१९ किलोच्या सिलेंडरचा नवा दर

मिळालेल्या माहितीनुसार, १९ किलोच्या व्यवसायिक स्वरुपात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडर दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत १९ किलोचा एलपीजी सिलेंडर १७ रुपयांनी महाग झाला असून, आता तो १२९७.५० रुपयांना मिळेल. यापूर्वी याचा दर १२८०.५० रुपये होता. तर कोलकाता येथे एलपीजी सिलेंडर १३८७.५० रुपयांवरून १४१० रुपये झाला आहे. कोलकातामध्ये २२ रुपयांनी सिलेंडर महागला आहे. तर राजधानी दिल्लीतही १७ रुपयांनी महागलेला १९ किलोचा एलपीजी सिलेंडर आता १३४९ रुपयांना मिळेल. याआधी दिल्लीत याचा दर १३३२ रुपये होता. 

बहुतांश प्रमाणात १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर वापरला जात असल्यामुळे याला सरकारकडून १२ सिलेंडरवर अनुदान दिले जाते. यापेक्षा अधिक सिलेंडर हवा असल्यास तो उपलब्ध बाजारमूल्यांनुसार ग्राहकाला खरेदी करावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाची किंमत आणि विनिमय दर यांनुसार देशातील सिलेंडरच्या दरात बदल केला जात असतो, असे सांगितले जाते. 

 

Web Title: increase in the price of LPG gas cylinders Find out the new rates in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.