Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात आॅनलाइन खरेदी वाढणार

देशात आॅनलाइन खरेदी वाढणार

देशात फोर जी सेवेचा विस्तार होत असतानाच आॅनलाइन खरेदी वाढणार असल्याचा अंदाज डेलायट या संस्थेने वर्तविला आहे. या अहवालात म्हटले आहे की, फोर जी सेवेच्या विस्तारासोबतच

By admin | Updated: March 28, 2016 01:43 IST2016-03-28T01:43:04+5:302016-03-28T01:43:04+5:30

देशात फोर जी सेवेचा विस्तार होत असतानाच आॅनलाइन खरेदी वाढणार असल्याचा अंदाज डेलायट या संस्थेने वर्तविला आहे. या अहवालात म्हटले आहे की, फोर जी सेवेच्या विस्तारासोबतच

Increase in online purchases in the country | देशात आॅनलाइन खरेदी वाढणार

देशात आॅनलाइन खरेदी वाढणार

मुंबई : देशात फोर जी सेवेचा विस्तार होत असतानाच आॅनलाइन खरेदी वाढणार असल्याचा अंदाज डेलायट या संस्थेने वर्तविला आहे. या अहवालात म्हटले आहे की, फोर जी सेवेच्या विस्तारासोबतच इंटरनेटचा वापर वाढेल. आज भारत डिजिटल प्लॅटफॉर्म बनत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकही आॅनलाइन सेवेला प्राधान्य देत आहेत. देशातील इंटरनेट समुदायात ग्रामीण भागात सेवा घेणाऱ्यांचे प्रमाण ३५ टक्के आहे.
देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण भागाचा हिस्सा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एकूणच फोर जीच्या विस्ताराबरोबरच आगामी काळात देशात आॅनलाइन व्यवहार वाढतील असा अंदाज आहे. भविष्यात आॅनलाइनचा हा व्यवसाय आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.

Web Title: Increase in online purchases in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.