नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत वेतनवाढीचा दर महागाईच्या वाढीच्या दरापेक्षा जास्त होईल, असे भाकीत एका अभ्यासात करण्यात आले आहे. या बदलाचा सर्वाधिक लाभ वरिष्ठ पातळीवरील कार्यकारींना होणार आहे. मध्यम आणि कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांना मात्र त्याचा फार फायदा होणार नाही, असाही अंदाज आहे.
टॉवर्स-वॅटसन आणि सीआयआय यांनी यासंबंधीचे अध्ययन केले आहे. येत्या पाच वर्षांत नोकऱ्यांची संख्याही वाढणार आहे; मात्र त्याचबरोबर सर्वांत वरच्या पातळीवर काम करणारे कार्यकारी आणि कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावतही वाढत जाणार आहे.
छोट्या संघटनांच्या जवळपास ६0 टक्के आणि मोठ्या संघटनांच्या ५४ टक्के लोकांना असे वाटते की, येत्या ५ वर्षांत वेतनातील विषमता वाढत जाणार आहे. उद्योगातील क्षेत्रीय पातळीवरील अभ्यासातही हीच बाब आढळून आली. वित्तीय सेवा क्षेत्रातील ७0 टक्के कंपन्या, विनिर्माण क्षेत्रातील ५४ टक्के कंपन्या आणि ऊर्जा व लोकोपयोगी सेवा देणाऱ्या क्षेत्रातील ३६ टक्के कंपन्यांना असे वाटते की, येणाऱ्या पाच वर्षांत वेतनातील असमानता वाढणार आहे.
आगामी पाच वर्षांत सर्वाधिक रोजगार कनिष्ठ पातळीवरील पदांवर होईल. त्यातही यंत्रसामग्री आणि परिवहन क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती होईल.
पाच वर्षांत महागाईपेक्षा अधिक वाढणार पगार
येत्या पाच वर्षांत वेतनवाढीचा दर महागाईच्या वाढीच्या दरापेक्षा जास्त होईल, असे भाकीत एका अभ्यासात करण्यात आले आहे.
By admin | Updated: April 1, 2015 01:50 IST2015-04-01T01:50:54+5:302015-04-01T01:50:54+5:30
येत्या पाच वर्षांत वेतनवाढीचा दर महागाईच्या वाढीच्या दरापेक्षा जास्त होईल, असे भाकीत एका अभ्यासात करण्यात आले आहे.
