मनोज गडनीस, मुंबई
देशाच्या अर्थकारणात सुधार येत असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत गृहकर्ज आणि क्रेडिट कार्डाच्या वितरणात वाढ झाली असल्याची माहिती ‘क्रेडिट इन्फोर्मेशन ब्यूरो आॅफ इंडिया लि.’(सिबिल) प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे पुढे आली आहे.
कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी ग्राहकाची पत निश्चित करण्याचे आणि त्या ग्राहकाच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी देण्याचे काम सिबिलतर्फे होते. त्यामुळे सिबिलच्या या माहितीला अधिक महत्व आहे.
संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत देशामध्ये गृहकर्जाच्या एकूण तीन लाख ९० हजार प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीमध्ये दोन लाख २० हजार गृहकर्ज प्रकरणांना मंजुरी मिळाली होती.
कर्जाच्या अन्य प्रकारांच्या तुलनेत गृहकर्ज आणि क्रेडिट कार्ड हे दोन मुद्दे अर्थस्थितीचे निर्देशक मानले जाण्याचे कारण म्हणजे, या दोन्ही घटकांचा संबंध संबंधित ग्राहकासोबत अनेक काळासाठी राहातो. त्यामुळेच त्याचे वितरण आणि वसुली या दोन्ही आकड्यांकडे अर्थ विश्लेषकांचे नेहमीच लक्ष असते.
या दोन्ही घटकांसोबतच वाहन कर्ज आणि ग्राहकोपयोगी वस्तूंवरील कर्ज याही प्रकारात वाढ नोंदली गेली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत या दोन्ही प्रकारांत १२ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.
गृहकर्ज वितरणात वाढ
देशाच्या अर्थकारणात सुधार येत असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत गृहकर्ज आणि क्रेडिट कार्डाच्या वितरणात वाढ झाली असल्याची माहिती ‘
By admin | Updated: June 22, 2015 23:41 IST2015-06-22T23:41:03+5:302015-06-22T23:41:03+5:30
देशाच्या अर्थकारणात सुधार येत असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत गृहकर्ज आणि क्रेडिट कार्डाच्या वितरणात वाढ झाली असल्याची माहिती ‘
