नवी दिल्ली : दूरसंचार चालकांना दिलासा देत ट्रायने ग्राहकांच्या बिलिंग व शुल्काशी संबंधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आॅपरेटरांना दोन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ देण्याची घोषणा केली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने सुरुवातीला बिलिंग व शुल्काशी संबंधित सर्व तक्रारींच्या निपटाऱ्याकरिता चार आठवड्यांची मुदत दिली होती.
ट्रायने १०० टक्के तक्रारींच्या निपटाऱ्याकरिता मुदत वाढवून आता सहा आठवडे केली आहे. दूरसंचार चालकांनी यासंदर्भात ट्रायकडे मागणी केली होती. यानंतर चार आठवड्यांत ९८ टक्के आणि सहा आठवड्यांत १०० टक्के तक्रारींची निवारण करण्याची मुदत निश्चित केली आहे. काही प्रकरणांत तक्रार दूर करण्यास विलंब होतो. अशा काही प्रकरणांमुळे तक्रारींचे १०० टक्के निवारण करण्याचे लक्ष्य चुकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बिलिंगशी संबंधित तक्रार निवारण वेळेत वाढ -ट्राय
दूरसंचार चालकांना दिलासा देत ट्रायने ग्राहकांच्या बिलिंग व शुल्काशी संबंधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आॅपरेटरांना दोन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ देण्याची घोषणा केली आहे
By admin | Updated: August 29, 2014 02:00 IST2014-08-29T02:00:43+5:302014-08-29T02:00:43+5:30
दूरसंचार चालकांना दिलासा देत ट्रायने ग्राहकांच्या बिलिंग व शुल्काशी संबंधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आॅपरेटरांना दोन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ देण्याची घोषणा केली आहे
