Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयकर विभाग शोधणार एक कोटी नवे करदाते

आयकर विभाग शोधणार एक कोटी नवे करदाते

करदायित्व असूनही करभरणा न करणाऱ्या अथवा उत्पन्न असूनही त्याचे विवरण न भरणाऱ्या अशा नागरिकांच्या शोधार्थ आयकर विभागाने एक विशेष

By admin | Updated: July 20, 2015 22:59 IST2015-07-20T22:59:22+5:302015-07-20T22:59:22+5:30

करदायित्व असूनही करभरणा न करणाऱ्या अथवा उत्पन्न असूनही त्याचे विवरण न भरणाऱ्या अशा नागरिकांच्या शोधार्थ आयकर विभागाने एक विशेष

The Income Tax Department will pay a million new taxpayers | आयकर विभाग शोधणार एक कोटी नवे करदाते

आयकर विभाग शोधणार एक कोटी नवे करदाते

मुंबई : करदायित्व असूनही करभरणा न करणाऱ्या अथवा उत्पन्न असूनही त्याचे विवरण न भरणाऱ्या अशा नागरिकांच्या शोधार्थ आयकर विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली असून याकरिता विभागाच्या अधिकाऱ्यांना विभागानिहाय लक्ष्य आखून देण्यात आले आहे. सध्या देशपातळीवर महिन्याकाठी नवे २५ लाख करदाते शोधण्याची मोहीम सुरू असून त्याखेरीज ही नवी मोहीम विभागाने हाती घेतली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्रात पुणे विभाग तर राज्याखेरीज देशपातळीवर दिल्ली, जम्मू, तेलंगण, हैदराबाद , पश्चिम बंगाल, गुजरात, सिक्की आदी राज्यांकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात येणार आहे. त्यातही मेट्रो अथवा मोठ्या शहरांच्या तुलनेत नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या गावांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रामध्ये पुणे विभागाकरिता १० लाख तर मुंबई विभागातून सहा लाख २३ हजार नवे करदाते शोधण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. गुजरातमधून सात लाख ८६ हजार तर दिल्लीमधून पाच लाख ३२ हजार नवे करदाते शोधण्याचे लक्ष्य आहे.

Web Title: The Income Tax Department will pay a million new taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.