विशेष इप्सन झोनचे उद्घाटन
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:05+5:302015-02-16T21:12:05+5:30

विशेष इप्सन झोनचे उद्घाटन
>वाणिज्य बातमी .. १० बाय ३ ...फोटो आहे. रॅपमध्ये ...कॅप्शन : पहिल्या विशेष इप्सन एक्सपिरीअन्स झोनचे उद्घाटन करताना राम प्रसाद आर.व्ही., बाजूला फे्रंचाईसी मिलिंद जोहरापूरकर आणि अन्य मान्यवर.- भारतातील नववे : एकाच छताखाली संपूर्ण रेंज प्रदर्शितनागपूर : इप्सनच्या पहिल्या विशेष इप्सन एक्सपिरीअन्स झोनचे (इ३) उद्घाटन कंपनीचे विक्री संचालक (दक्षिण व पश्चिम) राम प्रसाद आर.व्ही. यांच्या हस्ते झाले. झोनचे फें्रचाईसी व अरिहंत ट्रेडर्सचे संचालक मिलिंद जोहरापूरकर उपस्थित होते. नवे झोन ब्लॉक क्र. २, श्रीकृष्ण अपार्टमेंट, धंतोली, लोकमत चौकाजवळ आहे. राम प्रसाद यांनी सांगितले की, हे इप्सनचे भारतातील नववे दालन आहे. या झोनची निर्मिती ग्राहकांना इप्सनची सर्वोत्तम उत्पादन श्रेणी एकाच छताखाली देण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. नवीन झोनमध्ये आता घर, शाळा, व्यापार किंवा कार्यालयात वापरली जाणारी सर्वप्रकारची उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. होम थिएटर ते पर्सनल डेस्कटॉप अशी विविध उत्पादने तसेच मोठ्या संस्थांच्या नेटवर्किंगकरिता पर्याय आहेत. अत्यंत वाजवी दरातील फोटो पिं्रटर, फोटो व्यावसायिक व स्टुडिओधारकांना फोटो पिं्रटर, हाय रेझोलेशन स्कॅनर, कॉर्पोरेट ग्राहकांसाठी एलसीडी प्रोजेक्टर, सोप्या बिलिंग पद्धतीसाठी हाय स्पीड इंटेलिजंट प्रिंटर्स ग्राहकांना विकत घेता येतील. या झोनमुळे कंपनीचा व्यवसाय वाढेल. उद्घाटनप्रसंगी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक के. प्रकाश, विदर्भ व छत्तीसगडचे विक्री व्यवस्थापक प्रमोद कुमार, विदर्भ विभागाचे विक्री व्यवस्थापक सागर देशपांडे, झोनचे व्यवस्थापक नितीश जोहरापूरकर उपस्थित होते.