Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुधारणा तूर्तास थंडबस्त्यातच!

सुधारणा तूर्तास थंडबस्त्यातच!

नवीन सरकार आर्थिक सुधारणा कार्यक्रम कधी राबविणार याची मोठी उत्सुकता उद्योगजगताला लागून राहिलेली असली तरी, तूर्तास अशा सुधारणांकरिता आणखी थांबावे लागेल

By admin | Updated: September 8, 2014 03:45 IST2014-09-08T03:45:10+5:302014-09-08T03:45:10+5:30

नवीन सरकार आर्थिक सुधारणा कार्यक्रम कधी राबविणार याची मोठी उत्सुकता उद्योगजगताला लागून राहिलेली असली तरी, तूर्तास अशा सुधारणांकरिता आणखी थांबावे लागेल

Improvement soon! | सुधारणा तूर्तास थंडबस्त्यातच!

सुधारणा तूर्तास थंडबस्त्यातच!

न्यूयॉर्क : नवीन सरकार आर्थिक सुधारणा कार्यक्रम कधी राबविणार याची मोठी उत्सुकता उद्योगजगताला लागून राहिलेली असली तरी, तूर्तास अशा सुधारणांकरिता आणखी थांबावे लागेल अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दिली.
जे प्रकल्प लालफितीत अडकले आहेत किंवा रखडलेल्या अवस्थेत आहेत, त्यांना पूर्वत्वास नेण्यास सरकारचे प्राधान्य असल्याने त्यांच्या पूर्ततेशिवाय आर्थिक सुधारणा कार्यक्रमाची सुरुवात होणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. शिकागो कॉन्सिल आॅन ग्लोबल अफेअर्सतर्फे येथे आयोजित व्याख्यानादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. राजन म्हणाले की, स्थिर सरकार स्थापन झाल्यापासून आर्थिक सुधारणा कार्यक्रमांना गती मिळेल, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. मात्र जे प्रकल्प अकडले आहेत, त्यांचे मूल्य ५० ते ७० अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात आहेत त्यामुळे त्यांना मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच, अन्य जे लहान प्रकल्प आहेत त्यांनाही गतीशील करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पांचे काम मार्गस्थ झाले की, आर्थिक सुधारणा कार्यक्रम हाती घेतला जाऊ शकेल,असेही संकेत त्यांनी दिले.
जे महाकाय प्रकल्प सध्या अडकले आहेत ते पर्यावरणीय मुद्यांवरून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत तर काही वन कायद्याशी निगडीत आहेत, त्यामुळे त्यांचा निपटारा जलदगतीने करण्याकडे सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. रखडलेले प्रकल्प मार्गस्थ झाले तर त्यांच्यापासून होणारा फायदाही मोठा असेल. त्यामुळे त्यांना गतीशील करणे ही गरज असून त्या दृष्टीने केंद्र सरकार काम करत आहे. जून्या सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेल्या मात्र विविध कारणांमुळे अडकलेल्या प्रकल्पांना नवे सरकार गती देत आहे, याचा चांगला संकेत आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला असल्याचेही मत डॉ. राजन यांनी व्यक्त केले.(वृत्तसंस्था)

Web Title: Improvement soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.