Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताच्या वृद्धिदरात सुधारणा शक्य

भारताच्या वृद्धिदरात सुधारणा शक्य

वास्तविक व्याजदर सकारात्मक राहिल्याने आणि महागाई नियंत्रणात असल्याने खासगी क्षेत्रातील दरात वृद्धी होणे निश्चित आहे. या स्थितीत आर्थिक वृद्धीदर चांगला राहील

By admin | Updated: March 26, 2016 01:22 IST2016-03-26T01:22:09+5:302016-03-26T01:22:09+5:30

वास्तविक व्याजदर सकारात्मक राहिल्याने आणि महागाई नियंत्रणात असल्याने खासगी क्षेत्रातील दरात वृद्धी होणे निश्चित आहे. या स्थितीत आर्थिक वृद्धीदर चांगला राहील

Improvement in India's growth rate may be possible | भारताच्या वृद्धिदरात सुधारणा शक्य

भारताच्या वृद्धिदरात सुधारणा शक्य

मुंबई : वास्तविक व्याजदर सकारात्मक राहिल्याने आणि महागाई नियंत्रणात असल्याने खासगी क्षेत्रातील दरात वृद्धी होणे निश्चित आहे. या स्थितीत आर्थिक वृद्धीदर चांगला राहील आणि तो १९९८-२००२ च्या पुनरुद्धार चक्रापेक्षा चांगला राहील असा अंदाज ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅनले इंडियाने आपल्या अहवालात वर्तविला आहे.
मॉर्गन स्टॅनलेचे चेतन आहया यांनी हा अहवाल तयार केला आहे. त्यात १९९८ ते २००२ या काळातील तसेच २०१३ मध्ये सुरू असलेली सध्याची मंदी याची तुलना करण्यात आली आहे. त्यातील महत्त्वाच्या निकषात बरीच समानता दिसते असे हा अहवाल म्हणतो. आहया यांनी ‘मॅक्रो इंडिकेटर्स चार्ट-बुक : १९९८-२००२ या काळाची आठवण देणारा?’ या शीर्षकाखाली आपला अहवाल तयार केला आहे. त्यात म्हटले आहे की, खासगी क्षेत्रातील वाढणारा खप पाहता भारताची स्थिती १९९८-०२ च्या चक्रापेक्षा चांगली राहील. त्याचमुळे भारताची आर्थिक वृद्धी चांगली राहील. मात्र २००४-०७ च्या तुलनेत हा वृद्धीदर कमी असेल असा आमचा अंदाज आहे. या अहवालात म्हटले आहे की, खासगी खप आणि सार्वजनिक भांडवली खर्चाद्वारे खप वाढेल ही स्थिती १९९८-०२ मध्ये नव्हती.

Web Title: Improvement in India's growth rate may be possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.