कणतेच सरकार स्थायी नसते- शंकरनारायणन : पोटनिवडणुकीचे निकाल बोलके मुंबई - मिझोरामच्या राज्यपालपदी ज्या पद्धतीने बदली करण्यात आली त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत, कोणतेच सरकार स्थायी नसते. विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने सोमवारी हेच दाखवून दिले आहे, असा टोला माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी भाजपाला लगावला. राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेस पक्षात पुन्हा सक्रिय होणार असल्याचे त्यांनी रविवारीच जाहीर केले होते. सोमवारी येथील साद्री अतिथीगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांच्या या भूमिकेचा लगेच प्रत्यय आला. जनतेला गृहित धरणार्या राजकीय पक्षांना जनताच थारा देत नाही, असे मत त्यांनी पोटनिवडणुकीच्या निकालावर व्यक्त केले. केंद्र आणि काँग्रेसशासित राज्यांमध्ये तणावाच्या संदर्भात ते म्हणाले की, केवळ संख्याबळाने काही होत नसते. कुठल्याही सरकारने लोकशाहीचे संरक्षण करावयाचे असते. संघराज्य व्यवस्थेत केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणेच काम करायला हवे. घटनात्मक पदांना संरक्षण मिळायलाच हवे. माझ्यासह काही राज्यपालांना जी वागणूक मिळाली ते केंद्रातील नवीन सरकारचे धोरण असू शकते, असा चिमटाही त्यांनी काढला. या सरकारबद्दल अधिक काही बोलून आपण आपली प्रतिष्ठा आणि प्रतिमा सोडू इच्छित नाही, असा टोमणाही त्यांनी मारला. राज्यपालपद हे राजकीय नेत्यांच्या पुनर्वसनासाठी असते हा आक्षेप खोडून काढताना ते म्हणाले की, केवळ संकुचित लोकच असे बोलू शकतात. महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून मला खूप काम करता आले याचे समाधान आहे. (विशेष प्रतिनिधी)
महत्त्वाचे- शंकरनारायणन- पोटनिवडणूक
कोणतेच सरकार स्थायी नसते
By admin | Updated: August 25, 2014 22:33 IST2014-08-25T22:33:40+5:302014-08-25T22:33:40+5:30
कोणतेच सरकार स्थायी नसते
