Lokmat Money > बिझनेस न्यूज > (महत्त्वाचे) गणित-विज्ञानाचे निसर्गाशी नाते जुळणार !

(महत्त्वाचे) गणित-विज्ञानाचे निसर्गाशी नाते जुळणार !

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:38+5:302014-09-12T22:38:38+5:30

(Important) Mathematical science will have a natural relationship! | (महत्त्वाचे) गणित-विज्ञानाचे निसर्गाशी नाते जुळणार !

(महत्त्वाचे) गणित-विज्ञानाचे निसर्गाशी नाते जुळणार !

>
विशेष प्रयोगशाळा : वर्षभरात उपक्रमाला सुरूवात
पुणे : राज्यातील 33 जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डाएट) व राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदमध्ये (विद्या परिषद) गणित व विज्ञानाच्या विशेष प्रयोगशाळा निर्माण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याद्वारे विद्यार्थी तसेच शिक्षकांना गणित व विज्ञानातील संकल्पना निसर्गाशी नाते जोडून उलगडून दाखविल्या जातील.
गणित व विज्ञानातील विविध संकल्पना समजून घेणे विद्यार्थ्यांना अनेकदा कठीण जाते. मात्र, सभोवतालच्या घटना किंवा परिस्थितीचा गणित व विज्ञानाशी परस्परसंबंध उलगडून सांगितल्यास ते विद्यार्थ्यांच्या पटकन लक्षात राहते. याच धर्तीवर प्रयोगशाळेची संकल्पना असेल.
शालेय स्तरावर विज्ञान प्रयोगशाळा असतात. मात्र, अभ्यासक्रमात दिलेले नियम, सूत्र आणि संकल्पनांच्या आधारेच भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय शिकविले जातात. बहुतेकवेळा शाळांमध्ये याबाबत काही र्मयादा येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे गूढ अनेकदा उलगडत नाही. गणिताबाबतही हेच घडते. परीक्षेपुरते एखादे सूत्र समजले की विद्यार्थी खूश होतात. मात्र, त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी आपल्या भोवतालच्या परिसराशी काय संबंध आहे, त्याचा व्यवहारामध्ये आपण कसा उपयोग करू शकतो, याचे ज्ञान विद्यार्थ्यांना नसते. विद्यार्थ्यांना हे ज्ञान देण्यासाठी शिक्षकांना योग्य पद्धतीने प्रशिक्षित करण्यात येईल, असे विद्या परिषदेचे संचालक एन. के. जरग यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील विविध गोष्टींचा संबंध विज्ञान व गणिताशी असतो. हा संबंध विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने समजावून सांगणे, अभ्यासाची गोडी वाढविण्यासाठी या प्रयोगशाळा महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी राज्य सरकारने बेंगळुरू येथील अगस्त्या फाऊंडेशन संस्थेशी करार केला आहे. ही संस्था या प्रयोगशाळा उभारणे, प्रशिक्षण देण्यासाठी विद्या परिषदेला सहकार्य करणार आहे. त्यानुसार राज्यातील 100 ते 125 जणांना बेंगळुरू येथे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. 30 जणांची पहिली तुकडी 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळात प्रशिक्षण घेईल. त्यामध्ये काही शिक्षक, डायट व विद्या परिषदेतील काही अधिकार्‍यांचा समावेश असेल. त्यांच्यामार्फत नंतर प्रयोगशाळांमध्ये शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थी तसेच शिक्षकांना या प्रयोगशाळा खुल्या असणार आहेत. पुढील वर्षभरात या प्रयोगशाळा कार्यान्वित केल्या जातील,असे जरग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
-------------------

Web Title: (Important) Mathematical science will have a natural relationship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.