- ध्यादेश जारीमुंबई - शिक्षण आणि नोकर्यांमध्ये मराठा समाजाला १६ तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा अध्यादेश शुक्रवारी राज्य शासनाने जारी केला. त्यामुळे हे आरक्षण तत्काळ लागू झाले आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी त्यावर दोन दिवसांपूर्वीच स्वाक्षरी केली होती. शैक्षणिक आरक्षण हे सर्व विद्यापीठे, ज्यांना शासनाचे अनुदान मिळते अशा संस्था, शासनाची मालकी आणि नियंत्रण असलेल्या शैक्षणिक संस्था तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये लागू राहील. राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होणार्या किंवा न होणार्या संस्थांमध्येही आरक्षण असेल. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. दोन्ही आरक्षणांसाठी सामाजिक न्याय विभागाने निित केलेली उत्पन्न मर्यादेपेक्षा (क्रिमिलेयर) कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबालाच आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. नोकर्यांमधील आरक्षण सर्व शासकीय, निमशासकीय विभाग, महामंडळे, शासकीय कंपन्यांमध्ये लागू असेल. (विशेष प्रतिनिधी)
(महत्त्वाचे) मराठा, मुस्लिम आरक्षण तत्काळ लागू
- अध्यादेश जारी
By admin | Updated: July 11, 2014 21:45 IST2014-07-11T21:45:37+5:302014-07-11T21:45:37+5:30
- अध्यादेश जारी
