महत्त्वाचे - भगवानगड
By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:29+5:302014-10-03T22:56:29+5:30

महत्त्वाचे - भगवानगड
>पंकजाच्या मागे ओबीसींनी शक्ती उभी करावी अमित शहा : भगवानगडावर दसरा मेळावापाथर्डी (जि. अहमदनगर) : दुर्बल घटकांसाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्य झिजविले़ तोच वारसा आता पंकजा मुंडे चालवित आहे़ त्यांच्या मागे सर्वांनी शक्ती उभी करा़ त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात दिले. महाराष्ट्रात अन्याय विरुद्ध न्यायाची लढाई असून त्यात न्यायाचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ भगवानगडावर ३५ वर्षापासून गोपीनाथ मुंडे दसरा मेळाव्याला आवर्जून हजेरी लावत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत़ मात्र, त्यांच्या निधनानंतर भगवानगडावर शुक्रवारी पहिलाच दसरा मेळावा झाला़ शहा भाषणाला उठल्यानंतर गर्दीमधून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करा, अशा घोषणा होऊ लागल्या़ ते पाहून मी या ठिकाणी राजकीय वक्तव्य करण्यासाठी नाही तर भगवानबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे सांगत शहा यांनी वेळ मारुन नेली़ पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही माझ्यासोबत आहात, हीच माझी खरी ताकद आहे. आज या ठिकाणी गर्दी व उत्साह असला तरी वातावरण उदास आहे़ कारण माझे बाबा या ठिकाणी नाहीत. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला़ तोच वारसा मी चालवित आहे. माझी लढाई कोणत्या पक्षाशी तसेच थातूर-मातूर नेत्यांशी नाही़ माझी लढाई नियतीशी आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणायची हे मुंडे यांचे स्वप्न होते़ ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे़ महाराष्ट्रात बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही त्या म्हणाल्या.गडाचे महंत नामदेव शास्त्री, एकनाथ खडसे, गुजरातचे मंत्री शंकरभाई चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, प्रीतम मुंडे-खाडे, खा. दिलीप गांधी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़पंकजांचे डोळे पाणावलेमागील वर्षीच्या दसरा मेळाव्यातील गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणाची ध्वनीफित मेळाव्यात ऐकविण्यात आली़ ते ऐकताना पंकजा यांना गहिवरुन आले व त्यांनी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करुन दिली. कार्यकर्त्यांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते़ ------------------