Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्मार्ट खेडी योजना राबवल्यास शहरांचा बकालपणा कमी होईल

स्मार्ट खेडी योजना राबवल्यास शहरांचा बकालपणा कमी होईल

जयंत पाटील: ई-टेंडरिंगमुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम

By admin | Updated: February 17, 2016 02:00 IST2016-02-17T02:00:20+5:302016-02-17T02:00:20+5:30

जयंत पाटील: ई-टेंडरिंगमुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम

Implementation of smart village scheme will reduce the childhood's welfare | स्मार्ट खेडी योजना राबवल्यास शहरांचा बकालपणा कमी होईल

स्मार्ट खेडी योजना राबवल्यास शहरांचा बकालपणा कमी होईल

ंत पाटील: ई-टेंडरिंगमुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम
कुडरूवाडी- नवीन सरकारने स्मार्ट सिटी योजना सुरू केली असून शहरांवर कोट्यवधीचा निधी सोडला जात आहे. मात्र आज ग्रामीण भागातही करण्यासारखे भरपूर आहे. स्मार्ट खेडी योजना राबवल्यास शहरावर पडणारा ताण कमी होईल आणि शहरांचा बकालपणा कमी होईल, असे राज्य सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्य सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी नव्याने त्यांची निवड झाल्यानंतर अनौपचारिक गप्पा मारताना पाटील म्हणाले की, ग्रामीण माणूस शहराकडे वळू लागला असून तो शहरात झोपड्या वसवतो. त्यामुळे शहरांचा बकालपणा वाढला आहे. शहरातील एकेका उड्डाण पुलावर सरकार 50 कोटी खर्च करते तर दुसरीकडे एक हजार गावांसाठी 50 कोटी निधी देते. शहराप्रमाणे ग्रामीण भागाला निधी दिल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढतील व शहरावरचा ताण कमी होईल.
ग्रामीण भागात होणार्‍या विविध विकास कामातील पाच टक्के निधी ग्रामपंचायत विकास निधीमध्ये वळवावा. ग्रा. पं. हद्दीतील खरेदी-विक्री व्यवहार यातील ठराविक वाटा हा ग्रामपंचायतीला दिला तर ग्रामपंचायतींना सरकारकडे निधी मागण्याची गरज भासणार नाही. ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी भरपूर वाव आहे. त्यासाठी धोरणे बदलणे गरजेचे आहे, असे पाटील म्हणाले.
लवकरच सरपंच संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन घेणार असून त्यामध्ये महिलांच्या प्रo्नांवर स्वतंत्र चर्चा करण्यासाठी महिला सरपंचांचे स्वतंत्र अधिवेशन घेतले जाईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Implementation of smart village scheme will reduce the childhood's welfare