मख्यमंत्र्यांचे निवेदन(फोटो सावळ यांचा वापरावा)पणजी : बार्देस बाजारच्या फोंडा येथील शाखेतील माल लुटल्याबाबत पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून संबंधित जागेच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले़शून्य प्रहरावेळी डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. दिवसाढवळ्या बार्देस बाजारच्या शाखेत लूट केली गेली; पण पोलिसांनी आवश्यक पावले उचलली नाहीत, असे आमदार सावळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सावळ यांचे म्हणणे मान्य केले नाही. आपण स्वत: या विषयात लक्ष घातले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन बाउन्सरना अटक केली आहे. त्यामुळे पोलिसांनी काही केले नाही, असे म्हणता येत नाही. कोणत्याही इमारतीच्या मालकाने अशा प्रकारे वागू नये. भाडे कराराची अंमलबावणी झाली नाही तर संबंधित मालक न्यायालयात जाऊन आदेश आणू शकतो. पोलीस सध्या फोंड्याच्या त्या इमारतमालकाचा शोध घेत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बार्देस बाजार प्रश्नी पोलिसांची तत्काळ कारवाई
मुख्यमंत्र्यांचे निवेदन
By admin | Updated: August 21, 2014 19:33 IST2014-08-21T19:33:22+5:302014-08-21T19:33:22+5:30
मुख्यमंत्र्यांचे निवेदन
